जळगाव(प्रतिनिधी) : भारतीय जनता पार्टी जळगाव जिल्हा ग्रामीणच्या जिल्हा पदाधिकारी यांची बैठक जिल्हाध्यक्ष आमदार राजूमामा भोळे यांच्या प्रमुख उपस्थितीत आज दि ३ रोजी जळगावातील वसंतस्मूर्ती भाजपा कार्यालय येथे संपन्न झाली.
यावेळी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा जन्मदिवस १७ सप्टेंबर ते २ ऑक्टोंबर महात्मा गांधी जयंती पर्यंत “सेवा पंधरवाडा” साजरा करण्याचे राष्ट्रीय पातळीवर ठरले असून तो सेवा पंधरवाडा जिल्ह्यात देशील साजरा करण्यात येणार आहे. या पंधरवड्यात रक्तदान शिबीर, वृक्षारोपण, स्वच्छता अभियान, आरोग्य शिबीर असे विविध समाजपयोगी कार्यक्रम करण्याचे योजिले आहे. सदर कार्यक्रम यशस्वी राबविणे साठी जिल्हा संयोजक म्हणून जिल्हा उपाध्यक्ष श्री. प्रल्हाद पंडित पाटील व सह संयोजक म्हणून जिल्ह्याचे उपाध्यक्ष डी. एस. चव्हाण सर व जिल्हा चिटणीस प्रशांत पालवे यांची नियुक्ती या बैठकीत करण्यात आली आहे.
तसेच आगामी काळात भारतीय जनता पार्टीचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे हे जळगाव जिल्ह्यात येणार असून त्यांच्या संघटनात्मक दौऱ्यातील कार्यक्रमांवर चर्चा करण्यात आली. सदर बैठकीचा समारोप करताना जिल्हाध्यक्ष राजूमामा भोळे यांनी सांगितले कि आगामी सेवा सप्ताह यशस्वी करतानाच पुढील काळात येणाऱ्या जिल्हा परिषद, नगरपालिका निवडणुकांकडे लक्ष केंद्रित करून भाजपाचा बालेकिल्ला जळगाव जिल्हा पुन्हा करायचा आहे व भारतीय जनता पार्टीचा ध्वज पुन्हा फडकवायचा आहे. या बैठकीला जिल्हा उपाध्यक्ष नंदुभाऊ महाजन, राकेश पाटील, हिराभाऊ चौधरी, पद्माकर महाजन, अजय भोळे, प्रल्हाद पाटील, महेश पाटील, कांचन फालक, डी.एस.चव्हाण सर, पी.सी. आबा, जिल्हा संघटन सरचिटणीस सचिन पानपाटील, मधुकर काटे, हर्षल पाटील, जिल्हा चिटणीस राजेंद्र सोनवणे, प्रशांत पालवे, सोमनाथ पाटील, रवींद्र पाटील, संतोष खोरखळे, शैलेजा पाटील, सविता भालेराव, रंजना नेवे जिल्हा कार्यालय मंत्री गणेश माळी व जिल्हा संवादक हेमंत सोनवणे व गिरीश वराडे हे पदाधिकारी उपस्थित होते.