जामनेर (प्रतिनिधी) माजी मंत्री आमदार गिरीश महाजन यांच्या नेतृत्वात आज भारतीय जनता पार्टीच्यावतीने शहरातून ढोल, टाळ व शंखनादच्या गजरात रॅली काढत घंटानाद आंदोलन करण्यात आले. फक्त महाराष्ट्रातच्या मंदिरातच कोरोना येतो का ?, असा सवालही यावेळी गिरीश महाजन यांनी उपस्थित केला.
महाराष्ट्र राज्यामध्ये सत्तेत असलेल्या शिवसेना मोठमोठे कार्यक्रम घेतात. राज्यातील डान्स बार बियर बार बाजारपेठे मॉल सिनेमा थेटर सर्व चालू आहे त्याच बरोबर दुसऱ्या राज्यात मंदिरे उघडे आहे. त्यामुळे फक्त महाराष्ट्रातच मंदिरात कोरोना येतो का असा सवाल आमदार गिरीश महाजन यांनी केला, त्यामुळे आता भारतीय जनता पार्टी कोणतेही नियम मला घाबरणार नसून तुम्ही पोलिस उभे करा आम्ही आज पासून राज्यातील मंदिरे उघडे करू, अशी प्रतिक्रिया माध्यमांशी बोलताना दिली.