जळगाव (प्रतिनिधी) जळगाव शहर महानगरपालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राजकीय हालचालींना वेग आला असून विविध पक्षांसह अपक्ष उमेदवारांनी मोठ्या प्रमाणात अर्ज भरण्यास सुरुवात केली आहे. या पार्श्वभूमीवर भारतीय जनता पक्षाकडून प्रभाग क्रमांक १३ मधून वैशाली अमित पाटील यांना सर्वसाधारण महिला प्रवर्गातून उमेदवारी जाहीर झाल्याची माहिती समोर आली आहे.
या पार्श्वभूमीवर गिरीशभाऊ महाजन, आमदार राजूमामा भोळे व आमदार मंगेशदादा चव्हाण व भारतीय जनता पार्टीचे सर्व पदाधिकाऱ्यांनी मार्फत प्रभाग क्रमांक १३ मधून अमित पाटील यांच्या पत्नी वैशाली पाटील यांना सर्वसाधारण महिला प्रवर्गातून उमेदवारी जाहीर झाली आहे.
जळगाव महापालिका निवडणुकीत यंदा भाजपसह विविध पक्षांकडून जुन्या अनुभवी नगरसेवकांसोबतच काही नवीन आणि तरुण चेहऱ्यांना संधी दिली जात आहे. या पार्श्वभूमीवर वैशाली पाटील यांच्या उमेदवारीकडे विशेष लक्ष लागले असून प्रभाग क्रमांक १३ मध्ये ही लढत अधिक रंगतदार होण्याची शक्यता आहे. अमित पाटील यांच्या पत्नी असल्याने ही उमेदवारी राजकीय चर्चेचा विषय ठरत आहे.
दरम्यान, भाजपकडून आज दुपारी १ वाजता पक्ष कार्यालयात पत्रकार परिषद आयोजित करण्यात आली आहे. या पत्रकार परिषदेत महायुतीचा जागावाटपाचा अंतिम फॉर्म्युला तसेच उमेदवारांची अधिकृत यादी जाहीर केली जाणार असल्याची माहिती देण्यात आली आहे. कोणत्या प्रभागातून कोणाला संधी मिळणार, याबाबत कार्यकर्ते आणि मतदारांमध्ये उत्सुकता शिगेला पोहोचली आहे.















