धुळे (वृत्तसंस्था) धुळे महानगरपालिका महापौरपदी प्रदीप नाना कर्पे यांची निवड करण्यात आली आहे. ७३ पैकी ५० मत घेत भाजपाचे प्रदीप कर्पे यांचा विजय झाला असून ते आता धुळे महानगरपालिका महापौर असणार आहेत.
गेल्या काही महिन्यांपासून महापौर आरक्षणाच्या मुद्द्यावर न्यायप्रविष्ट असलेल्या महापौरपदासाठी ओबीसी आरक्षण जाहीर झाल्यानंतर धुळे महापालिका महापौरपदाची निवडणूक प्रक्रीया पार पडली. यामध्ये धुळे महानगरपालिकेत ७४ पैकी ५० नगरसेवक भाजपचे असल्यामुळे संख्येबाबत भाजपचे जास्त आहे. परंतु असे असल तरी शिवसेना, राष्ट्रवादी काँग्रेस व काँग्रेस पक्षातर्फे भाजपला कोंडीत पकडण्यासाठी तीनही पक्ष मिळून एकच उमेदवार देण्यात आला होता. त्यामुळे भाजपच्या चिंतेमध्ये वाढ झाली. तर भाजपतर्फे प्रदीप कर्पे यांना उमेदवारी देण्यात आली होती. ऑनलाईन निवड प्रक्रीयेत कर्पे यांच्या गळ्यात महापौर पदाची माळ पडली.