धरणगाव (प्रतिनिधी) धरणगाव तालुक्यातील बांभोरी शिवारात खुबचंद पेट्रोल पंपाच्या मागे असलेल्या टपरीत घरगुती गॅस रिक्षात भरून काळाबाजार सुरु असल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. याप्रकरणी पाळधी दूरक्षेत्र पोलीस ठाण्यात अनिल शंकर सोनवणे याच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
यासंदर्भात अधिक असे की, स्थानिक गुन्हे शाखेचे पोकॉ उमेशगिरी भगतगिरी गोसावी यांनी दिलेल्या फिर्यादीवरून, अनिल शंकर सोनवणे (वय ४४ रा. बांभोरी ता. धरणगाव) हा दि. ३ फेब्रुवारी २०२२ रात्री १०.३५ वाजेच्या सुमारास धरणगाव तालुक्यातील बांभोरी शिवारात खुबचंद पेट्रोल पंपाच्या मागे अनिल हा त्याच्या मालकीच्या टपरीमध्ये घरगुती गॅस रिक्षात भरतांना मिळून आला. याप्रकरणी पाळधी दूरक्षेत्र पोलीस ठाण्यात अनिल शंकर सोनवणे याच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला असून घरगुती गॅसचे १७ सिलेंडर, इलेक्ट्रीक मोटार, वजन काटा असा एकुण ५२ हजार ५०० रुपये किंमतीचा मुद्देमाल जप्त केला आहे. पुढील तपास सपोनि गणेश बुवा करीत आहेत.