चाळीसगाव (प्रतिनिधी) गेल्या चार महिन्यापासुन कोरोना काळात रुग्णांना बेड, व्हेंटिलेटर, ऑक्सिजन सुविधा, रुग्णांना व नातेवाईक यांना दोन वेळचे सकस जेवण देवुन समाजाप्रति कृतज्ञभाव व्यक्त करत रुग्नसेवक वर्धमान भाऊ धाडीवाल हे अविरत कार्य करत आहेत. आणी त्यांचा आज वाढदिवस याचे औचित्यसाधत सह्याद्री प्रतिष्ठान चाळीसगाव व वर्धमान भाऊ धाडीवाल मित्र मंडळ यांच्या संयुक्त विद्यमाने रक्तदान शिबीराचे आयोजन करण्यात आले होते.
यावेळी चाळीसगाव शहरातील/ग्रामीण भागातील रक्तदात्यांनी रक्तदान शिबीरास उत्तम प्रतिसाद देत, ७० रक्तबॅंग संकलीत करण्यात आल्या. जीवन सुरभी रक्तपेढी येथे शिबीराचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी चाळीसगाव शहर पोलिस स्टेशनचे पोलीस निरीक्षक विजय कुमार ठाकुर, डॉ. सुनिल राजपुत, वर्धमान भाऊ धाडीवाल, मुन्नाबापु राजपुत, नगरसेवक भगवान राजपूत, रामचंद्र जाधव, दिपक पाटील, लक्ष्मण बापू शिरसाट, नानासाहेब बागुल, मुराद पटेल सह्याद्री प्रतिष्ठानचे माजी अध्यक्ष दिलीप आबा घोरपडे, रोटरी क्लबचे सदस्य, आदी मान्यवरांनी भेट दिली.
सह्याद्रीचे दुर्गसेवक दिनेश घोरपडे, रविंद्र दुसिंग, जितेंद्र वाघ, विनोद शिंपी, दिपक पवार, शुभम चव्हाण, गजानन मोरे, दिपक राजपुत, डॉ. दत्ता भदाणे, विकास राठोड, पितांबर कोळी, भोला गुंजाळ, आकाश चव्हाण तसेच वर्धमान भाऊ धाडीवाल मित्र मंडळाचे गणेश आप्पा गवळी, नितीन पाटील, सतिष पवार, स्वप्निल गवळी, कुशल गवळी, आदित्य धाडीवाल यांनी मोलाचे सहकार्य केले.