नंदुरबार (प्रतिनिधी) नवापूर तालुक्यातील शासकीय आश्रम शाळेतील दहावीत शिकणाऱ्या विद्यार्थ्यांचा मृत्यू झाल्याची घटना आज सकाळी उघडकीस आली आहे. सदर विद्यार्थ्याचा मृतदेह शाळेच्या आवारात पडलेला आढळून आल्याने एकच खळबळ उडाली.
यासंदर्भात अधिक असे की, नवापुर तालुक्यातील धनराट शासकीय आश्रम शाळेत इयत्ता दहावीत शिकत असलेल्या भाऊ करज्या गावीत (वय १६) या विद्यार्थ्याचा मृत्यू झाल्याची घटना घडली. सदर विद्यार्थ्याचा मृतदेह सकाळी साडे सहाच्या दरम्यान शाळेच्या आवारात पडलेला आढळून आला. विद्यार्थ्यांनी शिपाईला सांगितल्यावर त्याने नवापूर उपजिल्हा रुग्णालयात दाखल केले. परंतु वैद्यकीय अधिकाऱ्यांनी त्याला मृत घोषित केले. शवविच्छेदनानंतर मुलाचा मृतदेह पालकांच्या हाती देण्यात आला असून त्यावर भोवरे या गावी अंत्यसंस्कार करण्यात येणार आहे.