बोदवड (प्रतिनिधी) तालुक्यातील साळशिंगी सरपंच यांनी अतिक्रमण केल्यामुळे तसेच त्यांच्या कुटुंबीय कामकाजात हस्तक्षेप करत असल्याने त्यांच्यावर पदाचा गैरवापर केल्याबद्दल कारवाई करण्याची जिल्हाधिकारी यांच्याकडे गावातील रहिवासी गिरीधर बिजागरे यांनी तक्रार केली आहे.
गिरीधर बिजागरे यांनी दिलेल्या तक्रार अर्जात असे नमूद केले आहे की, साळशिंगी येथील सरपंच सोनाली राजेंद्र पाटील (चौधरी) यांनी त्यांचे सासरे साहेबराव चौधरी यांच्या नावे असलेली जागा सि.स. नं ३२१,३२२.बांधकाम केलेले आहे. ही जागा बांधकाम करतांना ओटा बांधकाम करून अतिक्रमण केलेले असून जुनी मोरी बुजून टाकली आहे. त्यामुळे आम्हाला वापरण्यास अडचण होत आहे. या जागेचे बांधकाम करते वेळी सुद्धा त्यांना मनाई केली होती, त्यावेळी हे तात्पुरते असून नंतर काढून घेऊ, असे तोंडी त्यांनी सांगितले होते.
तक्रारीत पुढे नमूद केलेय की, सरपंच महीला असून त्यांचे सासरे साहेबराव चौधरी, पती राजेंद्र चौधरी, दिर विजय चौधरी हे कामकाजात हस्तक्षेप करत असतात. तरी त्यांनी परवानगी न घेता सिटी स.नं. ३२१,३२२ नुसार बांधकाम केले की नाही?, याबाबत चौकशी करावी व पदाचा गैरवापर केल्याबाबत कारवाई करावी. एवढेच नव्हे तर, गावातील कोंडवाड्याजवळ बेकायदेशीर भ्रष्टाचाराने टपऱ्या ठेवल्या आहेत. त्यामुळे कोंडवाडा बंद झाल्याची चौकशी करावी, अशी तक्रार साळशिंगी येथील गिरीधर यशवंत बिजागरे यांनी जिल्हाधिकारी यांच्याकडे १० एप्रिल रोजी केली आहे.