TheClearNews.Com
Friday, August 28, 2026
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
No Result
View All Result
Morning News
No Result
View All Result

मोठी बातमी : भुसावळातील झेडटीआरआयच्या प्राचार्यासह कार्यालय अधीक्षक जाळ्यात !

पुणे सीबीआयच्या कारवाईने प्रचंड खळबळ !

The Clear News Desk by The Clear News Desk
March 7, 2024
in गुन्हे, भुसावळ
0
Share on FacebookShare on Twitter

भुसावळ (प्रतिनिधी) रेल्वे प्रशिक्षण संस्थेत (झेडटीआरआय) लावलेल्या भाडे तत्वावरील वाहनाच्या लॉग बुकवर जुन्या तारखेत स्वाक्षरी करण्यासाठी तडजोडीअंती नऊ हजारांची स्वीकारताना झेडटीआरआयच्या प्राचार्यासह कार्यालय अधीक्षकाला पुणे सीबीआयने रंगेहाथ अटक केल्याने रेल्वेतील लाचखोर अधिकार्‍यांच्या गोटात प्रचंड खळबळ उडाली. बुधवार, 6 मार्च रोजी दुपारी 12 वाजेच्या सुमारास ही कारवाई करण्यात आली. कार्यालय अधीक्षक (टेंडर)योगेश देशमुख व प्राचार्य सुरेश चंद्र जैन अशी अटकेतील संशयितांची नावे आहेत.

लाच प्रकरणी कारवाई
भुसावळातील एका तक्रारदार तरुणाने रेल्वे प्रशिक्षण संस्थेत भाडे तत्वावर वाहने लावली आहेत. मार्च एण्ड पूर्वी लावलेल्या वाहनांचे बिल निघण्यासाठी तरुणाने कार्यालय अधीक्षक (टेंडर) योगेश देशमुख यांच्याशी संपर्क साधल्यानंतर जुने तारखेवरील लॉग बुकवर स्वाक्षरी करण्यासाठी प्राचार्य यांची स्वाक्षरी आणण्यासाठी लाच मागण्यात आली व नऊ हजारांची लाच स्वीकारण्याचे ठरल्यानंतर तक्रारदाराने पुणे सीबीआयकडे तक्रार नोंदवली व लाच पडताळणी करण्यात आली. बुधवारी दुपारी 12 वाजेच्या सुमारास सीबीआयने योगेश देशमुख यास लाच रक्कम दिल्यानंतर देशमुख याने प्राचार्यांच्या दालनात प्रवेश करीत लाच रक्कम प्राचार्यांना दिल्यानंतर दबा धरून बसलेल्या सीबीआय पथकाने सुरूवातीला देशमुख व नंतर सुरेश चंद्र जैन यांना अटक केली. या कारवाईनंतर रेल्वे वर्तुळातील लाचखोर अधिकार्‍यांच्या गोटात प्रचंड खळबळ उडाली.

READ ALSO

अल्पवयीन मुलीचा पाठलाग करुन त्रास देणाऱ्यास सहा महिने कारावास

बहिणीसोबतच्या प्रेमसंबंधातून तरुणावर चॉपरने प्राणघातक हल्ला

प्राचार्यांच्या घरासह कार्यालयाची झाडाझडती
पुण्यातील सीबीआय निरीक्षक महेश चव्हाण व 17 अधिकार्‍यांच्या उपस्थितीत लाच प्रकरणात प्राचार्यांसह कार्यालय अधीक्षकांवर कारवाई करण्यात आली. अधिकार्‍यांच्या पथकाने प्राचार्यांची दालनाची कारवाईनंतर झाडाझडती घेतली तसेच रेल्वे फिल्टर हाऊसजवळील डॅनियल चौकासमोरील ‘सी 254’ या प्राचार्यांच्या बंगल्याचीही झडती घेण्यात आली तसेच कार्यालय अधीक्षक देशमुख याच्या घराचीही झडती घेण्यात आली मात्र त्यात काही आढळले वा नाही ? याबाबत माहिती कळू शकली नाही. गेल्या अनेक दिवसांपासून प्राचार्यांसह कार्यालय अधीक्षकांच्या लाचखोरीच्या तक्रारी वाढल्या होत्या मात्र तक्रार देण्यास कुणीही पुढे येत नव्हते मात्र तरुणाने धाडस करीत तक्रार नोंदवली लाचखोर गजाआड झाल्यानंतर प्रशिक्षण संस्थेतील लाचखोरांमध्ये प्रचंड खळबळ उडाली.

2021 मध्ये डीआरएम कार्यालयात झाली होती कारवाई
सोमवार, 16 ऑगस्ट 2021 रोजी दुपारी 12.30 वाजता भुसावळ डीआरएम कार्यालयातील मंडळ अभियंता (विशेष कार्य, वर्ग- 1) एम.एल.गुप्ता व ओ.एस.संजय रडे यांना दोन लाख 40 हजारांची लाच घेताना नागपूर सीबीआयच्या पथकाने दालनातच रंगेहाथ अटक केली होती. मंजूर निविदांची वर्क ऑर्डर देण्यासाठी गुप्ता यांनी दोन लाख तर रडे यांनी 40 हजारांची लाच मागितल्याने मलकापूर येथील तक्रारदाराने हा सापळा घडवून आणला होता. विशेष म्हणजे घर झडतीत मंडळ अभियंता गुप्ता याच्या घरात 15 लाखांचे घबाडही पथकाला गवसले होते.

Share this:

  • Facebook
  • WhatsApp
  • Telegram
  • Twitter

Related Posts

गुन्हे

अल्पवयीन मुलीचा पाठलाग करुन त्रास देणाऱ्यास सहा महिने कारावास

August 27, 2026
गुन्हे

बहिणीसोबतच्या प्रेमसंबंधातून तरुणावर चॉपरने प्राणघातक हल्ला

August 27, 2026
गुन्हे

कारागृहाबाहेर फटाके फोडून साजरा केला बंदीचा वाढदिवस

August 27, 2026
गुन्हे

स्पिरीटपासून देशी दारु तयार करणाऱ्या कारखान्याचा पर्दाफाश

August 27, 2026
गुन्हे

धनादेश अनादर प्रकरणात आरोपीस एक वर्ष कारावास; जैन इरिगेशन कंपनीला ३० लाखांची नुकसान भरपाई

August 26, 2026
गुन्हे

रावेरात अल्पवयीन मुलीला बेकायदेशीरपणे लॉजमध्ये रूम देणाऱ्या मॅनेजरला अटक

August 26, 2026
Next Post

विशाल जयस्वाल रावेरचे तर प्रदीप ठाकूर यावलचे नूतन पोलीस निरीक्षक !

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

POPULAR NEWS

…म्हणून मी सरस्वतीच्या मृतदेहाचे तुकडे केले, सानेच्या दाव्याने हत्याकांडाला नवीन कलाटणी !

June 9, 2023

भल्यापहाटे पोलीस अधिकाऱ्याने पत्नी अन् पुतण्याला गोळ्या घातल्या ; नंतर स्वतः ही उचललं टोकाचे पाऊल !

July 24, 2023

धक्कादायक ! निर्जनस्थळी प्रेमी युगलाचा रोमान्स ; शारीरिक संबंध ठेवताना अल्पवयीन तरूणीचा जागीच मृत्यू !

March 27, 2023

अपघाताचा बनाव करून पतीनेच‎ पत्नीला कारमध्ये जिवंत जाळल्याचे उघड ; कारण वाचून तुम्हाला बसेल धक्का !

June 29, 2023

किरीट सोमय्या यांचा व्हायरल व्हिडिओ खरा की खोटा? ; पोलीस तपासात समोर आली मोठी माहिती !

July 26, 2023

EDITOR'S PICK

नक्षलवाद्यांकडून झालेल्या हल्ल्याचा अखिल भारतीय विद्यार्थी परिषदकडून तीव्र शब्दात निषेध

April 8, 2021

दिलासादायक : आज बाधित रूग्णांपेक्षा बरे होणा-या रूग्णांची संख्या जास्त ; ॲक्टीव्ह रूग्णांची संख्याही झाली कमी !

May 24, 2021

मोठी बातमी ! शिवसेनेचं विधीमंडळ कार्यालयच सील केलं !

July 3, 2022

भाजप नगरसेविकेच्या पतीकडून नाशिकच्या बिटको रुग्णालयात तोडफोड करत कर्मचाऱ्यांना शिवीगाळ

May 16, 2021
ADVERTISEMENT

About

The Clear News

१४ सप्टेंबर २०२० रोजी 'द क्लिअर न्यूज'ची अधिकृत सुरुवात झाली आहे. सोशल मिडियाच्या युगात अवघ्या काही क्षणात बातम्या, माहिती सर्वसामान्य माणसांपर्यंत पोहचवली जात असली तरी आपल्या मनात सर्वात मोठा प्रश्न उभा राहतो, तो म्हणजे सोशल मीडियात आलेली बातमी, माहिती ही वस्तुनिष्ठ आणि सत्यार्थी आहे का? वाचकांच्या मनातील या प्रश्नाचे उत्तर आहे ,'द क्लिअर न्यूज'...!! हो, तुमचे,आमचे ,सर्वांचे अत्यंत विश्वासार्ह असे डिजिटल न्यूज चॅनल...!!

Follow us

© . Powered by ContentOcean Infotech

No Result
View All Result
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक

© . Powered by ContentOcean Infotech

error: Content is protected !!
Join WhatsApp Group