बोदवड (प्रतिनिधी) बोदवड मेडिकल असोसिएशन तालुकाध्यक्षपदी अतुल अग्रवाल यांची नुकतीच निवड जाहीर करण्यात आली आहे.
जळगाव जिल्हा मेडिकल असोसिएशनच्या जिल्हा कार्यकारणीची मिटिंग जिल्हा संघटनेचे अध्यक्ष सुनील भंगाळे व सचिव अनील झवर व सर्व जिल्हा व तालुका पदधिकारी यांच्यासह केमिस्ट भवन जळगाव येथे संपन्न झाली. यावेळी बोदवड तालुका मेडिकल असोसिएशनची नवीन कार्यकारणी जाहीर करण्यात आली. यात तालुकाध्यक्ष म्हणून अतुल अग्रवाल, सचिव विलास तेली, सह सचिव राजेंद्र जयस्वाल जामठी, कोषाध्यक्ष राहुल शर्मा, जिल्हा ई. सी. संजय बंडगुजर, गजानन माळी, अविनाश पाटील यांची निवड जाहीर करण्यात आली.