बोदवड (प्रतिनिधी) बोदवड नगरपंचायत निवडणुकीत उमेदवारांना चिन्ह वाटप करण्यात आले. पालिकेत ओबीसी जागा असलेल्या चार प्रभागातील निवडणूक स्थगित झाली आहे. त्यामुळे उर्वरित १३ प्रभागांसाठी निवडणूक होत आहे. १३ प्रभागांपैकी ३ प्रभागात तिरंगी, ६ प्रभागांमध्ये चौरंगी, २ प्रभागात पंचरंगी, एका प्रभागात सप्तरंगी लढतीचे चित्र आहे. प्रभाग १ मध्ये भाजप, राष्ट्रवादी काँग्रेस व एक पक्षी चौरंगी लढती लक्ष्यवेधी आहे.
याशिवाय प्रभाग क्रमांक ४ मध्ये शिवसेना, भाजप व राष्ट्रवादी अशी तिरंगी, प्रभाग ५ आणि ६ मध्ये शिवसेना, राष्ट्रवादी, भाजप व दोन अपक्ष अशी पंचरंगी, प्रभाग ७ मध्ये शिवसेना, भाजप, राष्ट्रवादी व एक अपक्ष अशी चौरंगी, प्रभाग क्र. ८ मध्ये शिवसेना, भाजप, राष्ट्रवादी व चार अपक्ष अशीच सप्तरंगी, प्रभाग ९ मध्ये शिवसेना, राष्ट्रवादी व एक अपक्ष अशी तिरंगी, प्रभाग १० मध्ये शिवसेना, भाजप, राष्ट्रवादी व एक अपक्ष अशी चौरंगी, प्रभाग ११ मध्ये भाजप, शिवसेना, राष्ट्रवादी व एक अपक्ष अशी चौरंगी, प्रभाग १२ मध्ये भाजप, शिवसेना, राष्ट्रवादी व एक अपक्ष अशी चौरंगी, प्रभाग १३ मध्ये शिवसेना, भाजप, राष्ट्रवादी अशी तिरंगी, प्रभाग १४ मध्ये भाजप शिवसेना, राष्ट्रवादी व एक अपक्ष अशी चौरंगी, प्रभाग १६ मध्ये भाजप, शिवसेना व राष्ट्रवादी अशी तिरंगी लढत होणार आहे. या प्रभागातील सर्व उमेदवारांना मंगळवारी चिन्ह वाटप करण्यात आले.
















