TheClearNews.Com
Sunday, May 17, 2026
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
No Result
View All Result
Morning News
No Result
View All Result

महिला विद्युत कर्मचाऱ्याची हत्या ; जळगावात झालेल्या निषेध सभेत रिंकू बनसोडे यांना श्रध्दाजंली

vijay waghmare by vijay waghmare
April 25, 2024
in जळगाव
0
Share on FacebookShare on Twitter

जळगाव : वीजबिल अधिक का आले म्हणून जाब विचारण्यास आलेल्या एका विकृत मानसिकतेच्या तरुणाने एका ३४ वर्षीय महिला वीज कर्मचारी श्रीमती रिंकू बनसोडे यांची कोयत्याने वार करुन हत्या केल्याची घटना मोरगाव (ता. बारामती) येथे बुधवारी सकाळी ११.१५ वाजेच्या सुमारास घडली. या घटनेची जळगाव परिमंडलातील सर्व अधिकारी-कर्मचारी आणि कर्मचाऱ्यांच्या संघटनांनी निषेध सभा घेवून निंदा करीत करीत मयत कर्मचारी रिंकू बनसोडे यांना श्रद्धाजंली वाहिली.

READ ALSO

गावी गेलेल्या पोलीस पाटलाच्या घरात चोरट्यांची हातसफाई

नराधम मुख्याध्यापकाचा चिमुरडीवर अत्याचार

बुधवारी (दि. २४) सकाळी ११.१५ च्या सुमारास रिंकू बनसोडे या एकट्याच कार्यालयात उपस्थित होत्या. दरम्यान अभिजीत पोटे या व्यक्तीने रिंकू यांना बील जास्त आल्याचा जाब विचारला आणि एकामागोमाग एक असे जवळपास १६ वार रिंकू यांच्या हातापायावर तोंडावर केले. काही कळायच्या आतच रिंकू रक्ताच्या थारोळ्यात पडल्या. मोरगाव येथे प्रथमोपचार केल्यावर त्यांना तातडीने पुण्यातील सह्याद्री हॉस्पीटल मध्ये उपचारासाठी दाखल केले. परंतु दुर्दैवाने उपचारा दरम्यान त्यांचे दुपारी ३ वाजेच्या सुमारास प्राणज्योत मालवली. रिंकू बनसोडे यांच्या मृत्यूने महावितरणमधील कर्मचाऱ्यांवर शोककळा पसरली आहे. या घटनेचा कर्मचाऱ्यांसह सर्वच स्तरातून निषेध नोंदवला जात आहे.

किरकोळ बिलासाठी हल्ला
ज्याने हल्ला केला त्या आरोपीचे वीजबिल रत्नाबाई सोपान पोटे या नावाने आहे. एप्रिल २०२४ या महिन्याचे ६३ युनीट वीजवापराचे वीजबिल ५७० रुपये इतके आहे. मागील १२ महिन्याचा वापर तपासला असता तो ४० ते ७० युनीटमध्ये आहे. थकबाकी नाही. उन्हाचा तडाखा वाढल्यामुळे चालू महिन्यात वापर ३० युनीटने वाढला व त्याचे बील ५७० आले होते. हे बील वापरानुसार व नवीन दरानुसार योग्यच आहे. तसेच सदर ग्राहकाची वीजबिलाबाबत कोणतीही लेखी अथवा ऑनलाईन तक्रार नोंदवलेली नाही.
दरम्यान रिंकू बनसोडे यांच्या हत्येचे पडसाद संपूर्ण राज्यात उमटत असून महावितरणच्या जळगाव परिमंडलातही वीज कर्मचाऱ्यांनी व कर्मचाऱ्यांच्या विविध संघटनांनी एकञ येत घटनेचा निषेध व्यक्त केला. घटनेतील आरोपीस कठोर शिक्षा व्हावी त्यासाठी फास्टट्रॅक कोर्टात हे प्रकरण चालविण्यात यावे. अशीही मागणी या निषेध सभेत करण्यात येवून रिंकू बनसोडे यांना श्रध्दाजंली वाहाण्यात आली. जळगावच्या निषेध सभेत महावितरणचे सर्व अधिकारी-कर्मचारी, विविध कर्मचारी संघटनांचे प्रतिनिधी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Share this:

  • Facebook
  • WhatsApp
  • Telegram
  • Twitter

Tags: #jalgaonmahavitarna

Related Posts

गुन्हे

गावी गेलेल्या पोलीस पाटलाच्या घरात चोरट्यांची हातसफाई

May 17, 2026
गुन्हे

नराधम मुख्याध्यापकाचा चिमुरडीवर अत्याचार

May 16, 2026
जळगाव

जैन इरिगेशन सिस्टीम्सची दमदार कामगिरी…

May 15, 2026
गुन्हे

भरधाव डंपरच्या धडकेत दोन आदिवासी युवक ठार

May 15, 2026
गुन्हे

दरमहा परतावा देण्याचे अमिष ! गुंतवणूकदारांची 23 कोटी रुपयांत केली फसवणूक

May 15, 2026
एरंडोल

एरंडोल बस स्थानकाजवळ भीषण अपघातात दुचाकीस्वार जागीच ठार

May 15, 2026
Next Post

Horoscope Today : आजचे राशिभविष्य, 26 एप्रिल 2024 !

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

POPULAR NEWS

…म्हणून मी सरस्वतीच्या मृतदेहाचे तुकडे केले, सानेच्या दाव्याने हत्याकांडाला नवीन कलाटणी !

June 9, 2023

भल्यापहाटे पोलीस अधिकाऱ्याने पत्नी अन् पुतण्याला गोळ्या घातल्या ; नंतर स्वतः ही उचललं टोकाचे पाऊल !

July 24, 2023

धक्कादायक ! निर्जनस्थळी प्रेमी युगलाचा रोमान्स ; शारीरिक संबंध ठेवताना अल्पवयीन तरूणीचा जागीच मृत्यू !

March 27, 2023

अपघाताचा बनाव करून पतीनेच‎ पत्नीला कारमध्ये जिवंत जाळल्याचे उघड ; कारण वाचून तुम्हाला बसेल धक्का !

June 29, 2023

किरीट सोमय्या यांचा व्हायरल व्हिडिओ खरा की खोटा? ; पोलीस तपासात समोर आली मोठी माहिती !

July 26, 2023

EDITOR'S PICK

धरणगाव येथे कृषी विभागामार्फत अनुदानावर बियाणे वाटप

October 26, 2021

परीक्षेत उत्तीर्ण करण्याचं अमिष दाखवत प्राध्यापकाची विद्यार्थीनीकडे शरीर सुखाची मागणी

April 30, 2022

दुःख व्यक्त करण्यासाठी शब्द नाहीत ; पालकमंत्री छगन भुजबळ

April 21, 2021

जळगाव ग्रामीण मतदार संघात रस्ते विकासासाठी 45 कोटीच्या कामांना मान्यता : मंत्री गुलाबराव पाटील !

December 9, 2023
ADVERTISEMENT

About

The Clear News

१४ सप्टेंबर २०२० रोजी 'द क्लिअर न्यूज'ची अधिकृत सुरुवात झाली आहे. सोशल मिडियाच्या युगात अवघ्या काही क्षणात बातम्या, माहिती सर्वसामान्य माणसांपर्यंत पोहचवली जात असली तरी आपल्या मनात सर्वात मोठा प्रश्न उभा राहतो, तो म्हणजे सोशल मीडियात आलेली बातमी, माहिती ही वस्तुनिष्ठ आणि सत्यार्थी आहे का? वाचकांच्या मनातील या प्रश्नाचे उत्तर आहे ,'द क्लिअर न्यूज'...!! हो, तुमचे,आमचे ,सर्वांचे अत्यंत विश्वासार्ह असे डिजिटल न्यूज चॅनल...!!

Follow us

© . Powered by ContentOcean Infotech

No Result
View All Result
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक

© . Powered by ContentOcean Infotech

error: Content is protected !!
Join WhatsApp Group
 

Loading Comments...