बोदवड (प्रतिनिधी) बोदवड ग्रामीण रुग्णालयाचे उपजिल्हा रुग्णालयात रूपांतर करण्यात यावे, या मागणीचे निवेदन भोले महाकाल मल्टिपर्पज फाऊंडेशनकडून नुकतेच देण्यात आले.
तालुक्यात एकूण ५१ खेडे असून या सर्व लोकसंख्येचा ताण ग्रामीण रुग्णालयावर येत असून व ग्रामीण रुग्णालयातील मर्यादित सुविधामुळे जनतेचे आरोग्याच्या समस्या विषयी गैरसोय होत आहे .ही बाब लक्षात घेता ग्रामीण रुग्णालयाचे रूपांतर उपजिल्हा रुग्णालयात करण्यात यावे, अशा आशयाचे निवेदन देण्यात आले. यावेळी भोले महाकाल मल्टीपर्पज फाउंडेशनचे संस्थापक अध्यक्ष अनिल गंगतीरे, संघटक परेश शेळके, सदस्य रवींद्र पाटील, सागर कुकडे, गणेश लोणारे उपस्थित होते.