TheClearNews.Com
Thursday, May 21, 2026
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
No Result
View All Result
Morning News
No Result
View All Result

Weekly-Rashi-Bhavishya : साप्ताहिक राशिभविष्य १२ ते १८ मार्च २०२३ !

जाणून घ्या...कसा असेल तुमचा आठवडा !

The Clear News Desk by The Clear News Desk
March 12, 2023
in Uncategorized
0
Share on FacebookShare on Twitter

मेष : इतरांचे मत ऐकून घ्या. त्यावर पटकन आपले मत देऊ नका. हे दोन दिवस पुढे ढकललेले चांगले. दिनांक १३, १४ रोजी कितीही चांगले प्रस्ताव आले तर ते स्वीकारू नका. त्यासाठी थोडासा वेळ द्या. हे दोन दिवस फारसे योग्य राहणार नाहीत. त्यामुळे घाई करून चालणार नाही. बाकी दिवसांचा कालावधी उत्तम राहील. व्यवसायातून मिळणारे उत्पन्न योग्य ठिकाणी गुंतवावे. व्यवसायात चाललेल्या घडामोडींत बदल करू नका.

वृषभ : प्रत्येक गोष्टीमध्ये सहनशीलता ठेवा. वादविवाद करू नका. व्यावसायिकदृष्टय़ा धावपळ होणार आहे. ही धावपळ कमी करायची असेल तर आधीच योग्य नियोजन करून ठेवा, परिणामी चिडचिड होणार नाही. नोकरदार वर्गाने कामाव्यतिरिक्त कुठेही लक्ष केंद्रित करू नये. राजकीय क्षेत्रात काम करताना मनाची चलबिचल होणार आहे. कुटुंबाची काळजी घ्या. आरोग्याकडे दुर्लक्ष करू नका.

READ ALSO

खान्देशाचे प्रवेशद्वार चाळीसगाव येथे “गोदा ते नर्मदा” पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर जलयात्रेचे भव्य स्वागत!

झुरखेडा येथे लोकनियुक्त सरपंचांचे आमरण उपोषण सुरू

मिथुन : चांगले काम करण्यासाठी ती वेळ यावी लागते असेच म्हणावे लागेल. त्यासाठी स्वत:मध्येच बदल करून घेतलेला चांगला राहील. आपले काम करत राहणे व दिवस पुढे ढकलणे हेच योग्य राहील. नियमांच्या चौकटीत राहून सर्व दिवसांचा कालावधी जपून हाताळावा लागेल. व्यवसायात कोणतीही घाईगडबड न करता निर्णय घ्या. नोकरदार वर्गाने काम करताना पर्यायी मार्ग स्वीकारावा. कुटुंबातील वादविवाद वेळीच मिटवा.

कर्क : व्यावसायिक मोबदला चांगला मिळेल. व्यवसायातून मिळणारे उत्पन्न योग्य ठिकाणी गुंतवणूक करा. नोकरदार वर्गाने कामात आळसपणा करून त्रास वाढवून घेऊ नका. खर्चाची बाजू सांभाळा. दिनांक १५, १६ असे हे दोन दिवस अडचणीचे असले तरी वाईट आहेत असे म्हणता येणार नाही. अडचणींवर मात करून पुढे जायला शिका. प्रत्येक गोष्टीत यश मिळेल असे नाही. म्हणून प्रयत्न सोडून देऊन चालणार नाही. असा हा दोन दिवसांचा कालावधी असेल. बाकी दिवसांचा कालावधी उत्तम राहील.

सिंह : व्यावसायिकदृष्टय़ा कमतरता भरून निघेल. व्यवसायासाठी काढलेले कर्ज त्वरित फेडाल. कर्जाचा भार हलका झाल्याने नवीन काम करण्यासाठीची उत्सुकता वाढेल. नोकरदार वर्गाला कामाचा आढावा घेताना वरिष्ठांची मर्जी संपादन कराल.खर्च कमी केला तर आर्थिक विवंचना दूर होतील. दिनांक १७, १८ रोजीचे दोन दिवस कोणाच्याही भानगडीत पडू नका, गैरसमज वाढू शकतात. स्वत:लाही त्रास होऊ शकतो.

कन्या : व्यावसायिकदृष्टय़ा प्रगती होईल. व्यावसायिक वाढलेली जबाबदारी पार पाडाल. नोकरदार वर्गाच्या कामात अचूकता राहील. आर्थिक बाबतीत व्यवहार रोखठोक करा. या सप्ताहात त्रासाचे प्रमाण कमी राहील. सध्या सर्व दिवस चांगले असणार आहेत. ज्या ज्या वेळी ग्रहांची स्थिती चांगली असेल, त्या त्या वेळी संधी सोडू नका. ज्या कामात हात घालू ते काम पूर्ण होणार, असाच अनुभव या दिवसांत येत राहील. समोरून आलेला प्रस्ताव स्वीकारा.

तूळ : ज्या गोष्टीची तुम्ही आतुरतेने वाट पाहात आहात ती गोष्ट पूर्ण होईल. स्वत: केलेले नियोजन यशस्वी होईल. या कालावधीत महत्त्वाचे निर्णय घ्याल. रंगपंचमीच्या दिवशी मौजमजा कराल. सप्ताहातील सर्व दिवस चांगले जातील. व्यवसायात कलाकुसरीच्या वस्तूंचे उत्पादन वाढेल. फायद्याचे प्रमाण उत्तम राहील. नोकरदार वर्गाची कामांमध्ये धावपळ होणार नाही. आर्थिक स्थिती चांगली राहील. प्रत्येक गोष्टीत उशीर करायला लावणारे हे ग्रहमान आता मनासारखे होणार आहे.

वृश्चिक : व्यावसायिक परिस्थितीत स्वत:हून बदल करण्याची गरज भासणार नाही. व्यवसायातील घडी सुरळीत असेल. नोकरदार वर्गाला कामामध्ये आलेले दडपण कमी होईल. खर्च कमी करून काटकसर करा. नातेवाईकांच्या सुखदु:खात सहभागी व्हाल.दिनांक १२ रोजीचा एकच दिवस सोडला तर बाकी दिवसांचा कालावधी उत्तम जाईल. या उत्तम कालावधीमध्ये चांगले बदल घडणार आहेत. बऱ्याच दिवसांपासून जी कामे रेंगळत होती ती आता पूर्ण होतील.

धनू : व्यावसायिकदृष्टय़ा स्पर्धात्मक युगात योग्य असे व्यवस्थापन केले तर टिकून राहणे अवघड होणार नाही. नोकरदार वर्गाच्या कामातील त्रुटी सुधाराव्या लागतील. आर्थिकदृष्टय़ा समीकरण जुळून येईल. मात्र खर्चावर नियंत्रण ठेवावे लागेल. समाजसेवा करताना काळ-वेळेचे भान ठेवा. दिनांक १३, १४ रोजी कितीही राग आला तरी तो आवरण्याचा प्रयत्न करा. परिस्थिती अशी निर्माण होणार आहे की तुमच्या स्पष्ट बोलण्याने इतरांची मने दुखावली जाणार आहेत. त्यामुळे कोणतीच कामे वेळेत होणार नाहीत. हे दोन दिवस जेवढे शांत राहता येईल तेवढे राहा. शांत राहिलात तर पुढचे दिवसही चांगले जातील.

मकर : व्यावसायिक उत्पादनात वाढ होईल. व्यावसायिक देणी वेळेत फेडू शकाल. नोकरदार वर्गाने वरिष्ठांच्या सूचनांचे पालन करा. मित्र-मैत्रिणींशी मनमोकळेपणाने संवाद साधाल. संतती विषय गोड बातमी कळेल. दिनांक १५ , १६ रोजीचे दोन दिवस असे आहेत की धाडसी निर्णय घेऊन चालणार नाही, त्यात नुकसान होऊ शकते. त्यामुळे हे दोन दिवस सतर्कता बाळगा. प्रत्येक गोष्ट आपल्या मर्जीनेच होईल असे नाही. त्यात चढउतार राहणार आहे, ही गोष्ट स्वीकारा.

कुंभ : व्यावसायिकदृष्टय़ा काही नवीन योजना अमलात आणाल. भागीदारी व्यवसायात यश मिळेल. नोकरदार वर्गाला जबाबदारी घ्यावी लागेल. आर्थिक बाबतीत व्यवहार मार्गी लागतील. राजकीय क्षेत्रात धाडसी निर्णय घ्याल. दिनांक १७, १८ रोजीचे दोन दिवस मुद्दाम एखाद्या गोष्टीच्या तळाशी जाऊ नका. जुन्या वादविवादांपासून लांब राहा. त्यामुळे कारण नसताना किरकोळ गोष्टीवरून वाद होऊ शकतात. हे दोन दिवस कोणतेही करार करू नका. एखाद्याला जामीन राहायचे असेल तर या दोन दिवसांत होऊ नका.

मीन : व्यवसायात मागील काही दिवसांपेक्षा सध्याची स्थिती चांगली असेल. उलाढाल मोठय़ा प्रमाणात होईल. नोकरदार वर्गाला कामाच्या संदर्भात चर्चा करता येईल. आर्थिकदृष्टय़ा सक्षम बनाल. राजकीय क्षेत्रातील दबावतंत्र कमी होईल. भाग्यस्थानातून लाभस्थानाकडे चंद्राचे भ्रमण होत आहे. सप्ताहात सर्व दिवसांचा कालावधी चांगला असल्यामुळे सकारात्मक बदल होईल. आजचे काम उद्यावर करण्याची वेळ येणार नाही. कितीही चांगले दिवस असले तरी तुमच्या मनाची चलबिचल काही कमी होत नाही.

Share this:

  • Facebook
  • WhatsApp
  • Telegram
  • Twitter

Related Posts

Uncategorized

खान्देशाचे प्रवेशद्वार चाळीसगाव येथे “गोदा ते नर्मदा” पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर जलयात्रेचे भव्य स्वागत!

April 29, 2026
Uncategorized

झुरखेडा येथे लोकनियुक्त सरपंचांचे आमरण उपोषण सुरू

April 16, 2026
Uncategorized

सकारात्मक पत्रकारितेचा गौरव : पत्रकार ईश्वर महाजन यांना “पॉझिटिव्ह जर्नालिझम अवॉर्ड 2025”

March 16, 2026
Uncategorized

शाळेत सोडण्याच्या बहाण्याने नेत विद्यार्थीनीवर अत्याचार

March 6, 2026
Uncategorized

भुसावळ अमृत पाणीपुरवठा योजनेच्या रखडलेल्या कामावरून एकनाथराव खडसे आक्रमक; विधान परिषदेत सरकारला धारेवर धरले

March 1, 2026
Uncategorized

वासुदेव जेष्ठ नागरिकासंघाचे सवलतीत तीर्थाटन

March 1, 2026
Next Post

कारला भीषण अपघात; एकाच कुटुंबातील ६ जणांचा मृत्यू, ७ जखमी !

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

POPULAR NEWS

…म्हणून मी सरस्वतीच्या मृतदेहाचे तुकडे केले, सानेच्या दाव्याने हत्याकांडाला नवीन कलाटणी !

June 9, 2023

भल्यापहाटे पोलीस अधिकाऱ्याने पत्नी अन् पुतण्याला गोळ्या घातल्या ; नंतर स्वतः ही उचललं टोकाचे पाऊल !

July 24, 2023

धक्कादायक ! निर्जनस्थळी प्रेमी युगलाचा रोमान्स ; शारीरिक संबंध ठेवताना अल्पवयीन तरूणीचा जागीच मृत्यू !

March 27, 2023

अपघाताचा बनाव करून पतीनेच‎ पत्नीला कारमध्ये जिवंत जाळल्याचे उघड ; कारण वाचून तुम्हाला बसेल धक्का !

June 29, 2023

किरीट सोमय्या यांचा व्हायरल व्हिडिओ खरा की खोटा? ; पोलीस तपासात समोर आली मोठी माहिती !

July 26, 2023

EDITOR'S PICK

३५ वर्षीय महिलेचा विनयभंग ; धरणगाव पोलिसात एकाविरुद्ध गुन्हा !

May 20, 2022

जालना नगर पालिकेची स्वाती पवार लढविणार निवडणूक !

August 30, 2021

डॉ. मोईज देशपांडे खान्देश गौरव पुरस्काराने सन्मानित

October 31, 2021

संतापजनक : मृत वृद्धेच्या शरीरावर केला तीन दिवस अत्याचार !

August 27, 2024
ADVERTISEMENT

About

The Clear News

१४ सप्टेंबर २०२० रोजी 'द क्लिअर न्यूज'ची अधिकृत सुरुवात झाली आहे. सोशल मिडियाच्या युगात अवघ्या काही क्षणात बातम्या, माहिती सर्वसामान्य माणसांपर्यंत पोहचवली जात असली तरी आपल्या मनात सर्वात मोठा प्रश्न उभा राहतो, तो म्हणजे सोशल मीडियात आलेली बातमी, माहिती ही वस्तुनिष्ठ आणि सत्यार्थी आहे का? वाचकांच्या मनातील या प्रश्नाचे उत्तर आहे ,'द क्लिअर न्यूज'...!! हो, तुमचे,आमचे ,सर्वांचे अत्यंत विश्वासार्ह असे डिजिटल न्यूज चॅनल...!!

Follow us

© . Powered by ContentOcean Infotech

No Result
View All Result
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक

© . Powered by ContentOcean Infotech

error: Content is protected !!
Join WhatsApp Group