TheClearNews.Com
Friday, May 8, 2026
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
No Result
View All Result
Morning News
No Result
View All Result

Weekly Horoscope : साप्ताहिक राशीभविष्य ४ जून ते १० जून २०२३ !

जाणून घ्या...हा आठवडा तुमच्यासाठी कसा राहील जाणून घ्या !

The Clear News Desk by The Clear News Desk
June 4, 2023
in Uncategorized
0
Share on FacebookShare on Twitter

मेष : व्यावसायिकदृष्टय़ा खरेदी-विक्री व्यवहार मोठय़ा प्रमाणात होतील. फायद्याचे प्रमाण चांगले राहील. नोकरदार वर्गाला सध्याचे वातावरण चांगले राहील. आर्थिक भरभराट होईल. राजकीय क्षेत्रात वरिष्ठांचा वरदहस्त राहील. दिनांक ४ रोजीचा एकच दिवस अनुकूल नाही. त्यामुळे या दिवशी कोणतीही गोष्ट विचारपूर्वक करा. बाकी दिवसांचा कालावधी उत्तम असेल. विलंबनाने होणाऱ्या गोष्टी त्वरित होऊ लागतील. त्यामुळे चांगल्या गोष्टींचा प्रारंभ करण्यासाठी तुमच्याकडून उशीर होणार नाही याची काळजी घ्या.

वृषभ : चांगल्या कालावधीमध्ये बरेच काही साध्य करता येणार आहे. केलेल्या प्रयत्नांना यश मिळेल. व्यवसायातून मिळालेले उत्पन्न योग्य ठिकाणी गुंतवता येईल. नोकरदार वर्गाच्या कामात बदल होतील. आर्थिकदृष्टय़ा अनपेक्षित लाभ होईल. दिनांक ५, ६ हे दोन दिवस कोणाकडून अपेक्षा ठेवून चालणार नाही. एखादी वैयक्तिक गोष्ट मनमोकळेपणाने इतरांजवळ व्यक्त कराल, तर स्वत:हून स्वत:ची अडचण वाढवाल हे लक्षात ठेवा. तेव्हा वैयक्तिक गोष्टी इतरांसमोर व्यक्त करू नका. वादविवाद या गोष्टीपासून लांब राहा. नकारार्थी विचार करणे टाळा.

READ ALSO

खान्देशाचे प्रवेशद्वार चाळीसगाव येथे “गोदा ते नर्मदा” पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर जलयात्रेचे भव्य स्वागत!

झुरखेडा येथे लोकनियुक्त सरपंचांचे आमरण उपोषण सुरू

मिथुन : या आठवड्यात ‘आपले काम भले नि आपण भले’ हेच सूत्र लक्षात ठेवा. व्यवसायात जे चालले आहे ते ठीक आहे. त्यात बदल करू नका. नोकरदार वर्गाने कामात गुंतून राहिलेले चांगले. आर्थिकदृष्टय़ा व्यवहार रोखीचे करा. या सप्ताहात जपूनच पाऊल टाकावे लागेल. आपली बाजू खरी जरी असली तरी ती मांडण्याची वेळ नाही हे मात्र लक्षात ठेवा. मागील गोष्टी उगाळत बसण्यात वेळ घालवू नका. त्यामुळे स्वत:चेच नुकसान होऊ शकते. एखादी गोष्ट नाही पटली तर ती सोडून द्या व पुढे चला. अडचणी जरी आल्या तरी पर्यायी मार्ग शोधून बाहेर कसे पडता येईल यासाठी प्रयत्न करा.

कर्क : या आठवडय़ात प्रत्येक गोष्टीचा मागचापुढचा विचार करून निर्णय घ्या. रागाच्या भरात घेतलेले निर्णय त्रासाचे ठरू शकतात. सध्याची परिस्थिती पाहता शांतपणाने परिस्थिती हाताळण्याचा प्रयत्न करा. इतरांनी आपले ऐकावे, ही अपेक्षा सोडून द्या. व्यवसायात नवीन योजनांचा प्रारंभ करू नका. नोकरदार वर्गाचे कामकाज सुरळीत चालण्यासाठी कामाचे वेळापत्रक तयार करा. वायफळ खर्च टाळा. राजकीय क्षेत्रात उत्साह वाटणार नाही. मित्रपरिवाराची मदत मिळेल. कुटुंबात होणारे गैरसमज वेळीच दूर करा.

सिंह : व्यवसायात जुने काही व्यवहार बाकी असतील तर ते पटकन करून घ्या. कोणाच्या सांगण्यावरून गुंतवणूक करू नका. नोकरदार वर्गाला कामाचा अनुभव चांगला राहील. आर्थिक बाबतीत व्यवहार चोख ठेवा. समाजसेवा करावीशी वाटेल. मित्रमैत्रिणींसोबत करमणूक घडेल. कौटुंबिक जबाबदारी पार पाडत असताना वादविवाद टाळा. दिनांक ७, ८ रोजी अंथरूण पाहून पाय पसरावे लागेल. म्हणजेच ज्या गोष्टी झेपणार नाही अशा गोष्टी करणे टाळा. अन्यथा नुकसान होऊ शकते. कोणत्याही विषयावर चर्चा करताना स्पष्टवक्तेपणा टाळा. इतरांच्या सल्ल्याने कोणताही निर्णय घेऊ नका. त्यामुळे त्रास होऊ शकतो.

कन्या : नवीन व्यवसाय सुरू करण्यासाठी केलेला प्रयत्न यशस्वी होईल. नोकरदार वर्गाला कामाच्या बाबतीत तडजोड स्वीकारावी लागणार नाही. आर्थिकदृष्टय़ा पारडे जड राहील. राजकीय क्षेत्रात काम करण्याची मानसिकता होईल. भावंडांशी संवाद साधाल. दिनांक १० रोजीचा दिवस सोडला तर बाकी दिवस उत्तम असतील. बऱ्याच वेळा आपले काम करून दुसऱ्यांच्या कामासाठी वेळ द्यावा लागत होता. त्यामुळे चिडचिड वाढत होती. सध्या या गोष्टीसाठी वेळ घालवावा लागणार नाही. इतरांच्या मदतीची गरज भासणार नाही. स्वत:च्या कर्तृत्वानेच बरेच काही साध्य होणार आहे.

तूळ : व्यवसायातील धाडसी निर्णय घेताना भावनिक गोष्टींचा विचार करू नका. व्यापारी वर्गाला दिलासा मिळेल. नोकरदार वर्गाला कामात येणारे तांत्रिक अडथळे कमी होतील. आर्थिकदृष्टय़ा सक्षम बनाल.राजकीय क्षेत्रातील घडामोडींचा अंदाज येईल. या सप्ताहात एकही दिवस असा नाही, की ज्या दिवशी संघर्ष करावा लागणार आहे. त्यामुळे कोणतेही काम करताना उत्साह वाढेल. प्रयत्न करूनही यश मिळत नव्हते. त्यामुळे निराशाजनक परिस्थिती निर्माण व्हायची. वेळ आली की सर्व गोष्टी सुरळीत मार्गी लागतील. अगदी ठरवून ठेवल्याप्रमाणे कामे होत राहतील.

वृश्चिक : या सप्ताहात कोणाच्या भरवशावर किती अवलंबून राहायचे याचा अनुभव आल्यामुळे स्वत:मध्ये बदल घडवाल. सध्या आपण म्हणेल ती पूर्व दिशा, असे म्हणणे काही वावगे ठरणार नाही. या सप्ताहात मात्र तुमचे मत इतरांना तुम्ही पटवून देण्यात यशस्वी व्हाल. व्यवसायात पूर्वीपेक्षा सध्याची परिस्थिती सुधारलेली असेल. नोकरदार वर्गाला कामकाजातील नियमांचे पालन करावे लागेल. आर्थिक बाबतीत व्यवहार मार्गी लागतील. समाजसेवा करताना सामंजस्याने तोडगा काढा. नातेवाईकांच्या भेटीगाठी होतील.

धनू : व्यावसायिक खरेदी-विक्री व्यवहार चांगले होतील. फायद्याची परिस्थिती चांगली असणार आहे. नोकरदार वर्गाच्या कामातील त्रुटी वेळीच सुधारल्या जातील. आर्थिक बाबतीत उधारी करणे टाळा. सार्वजनिक ठिकाणी न जमणाऱ्या गोष्टींसाठी प्रयत्न करू नका. दिनांक ४ रोजी भावनेच्या आहारी जाऊन कोणतीही गोष्ट करू नका. हा दिवस अनुकूल नाही. बाकी दिवसांचा कालावधी मात्र उत्तम असेल. सध्या आगामी काळासाठी काही नियोजन करावयाचे असल्यास करा. ते यशस्वी होईल. त्यासाठी इतरांचे सहकार्यही मिळेल.

मकर : व्यवसायात नवीन काही दिशा मिळेल. ही दिशा आगामी काळासाठी चांगली असेल. मात्र फार घाई करू नका. नोकरदार वर्गाला कामाचा ताण कमी होईल. आर्थिक बाबतीत नियोजन करा. राजकीय क्षेत्रात काम करताना इतरांशी स्पर्धा करणे टाळा. दिनांक ५, ६ हे दोन दिवस शांत राहून सुवर्णमध्य साधा. सरळमार्गी वाटचाल ठेवा. प्रत्येक गोष्टीत ‘मीच बरोबर आहे’ हे ब्रीदवाक्य बाजूला ठेवा. बाकी दिवसांचा कालावधी चांगला असेल.

कुंभ : भागीदारी व्यवसायाला नवीन चालना मिळेल. नोकरदार वर्गाला कामामध्ये वरिष्ठांचा पाठिंबा मिळेल. खर्च आटोक्यात ठेवा. समाजमाध्यमांपासून प्रसिद्धी मिळेल. मित्रमंडळींसोबत सहलीचे बेत आखाल. मुलांचे लाड पुरवाल. दिनांक ७, ८ हे दोन दिवस आळस झटकून कामाला लागा. प्रत्येक गोष्टीत इतरांवर अवलंबून राहू नका. त्यामुळे नुकसान होऊ शकते. स्वत:च्या जबाबदारीवर स्वत:चे काम करा. अफवांवर विश्वास ठेवू नका. इतरांचे मत ऐकून घ्या. त्यावर प्रतिक्रिया देऊ नका. शांतपणाने हे दोन दिवस पुढे ढकला. त्यानंतरचा कालावधी चांगला असेल.

मीन : व्यवसायवाढीचे तंत्रज्ञान चांगले जमेल. अपेक्षित उत्पादन वाढेल. नोकरदार वर्गाला ज्येष्ठांची मदत मिळेल.आर्थिक स्थिती उत्तम राहील. राजकीय क्षेत्रात मानाचे स्थान मिळेल. नवीन ओळखीचा फायदा होईल. १० तारखेचा एकच दिवस सोडला तर बाकी दिवस उत्तम असतील. ज्या गोष्टींची जबाबदारी घेणे शक्य नव्हते ती जबाबदारी पार पाडाल. रखडलेली कामे पूर्ण होतील. त्यासाठी कोणावर अवलंबून राहण्याची गरज भासणार नाही. वेळेत गोष्टी होऊ लागतील. त्यामुळे फार धावपळ करायची गरज भासणार नाही.

Share this:

  • Facebook
  • WhatsApp
  • Telegram
  • Twitter

Related Posts

Uncategorized

खान्देशाचे प्रवेशद्वार चाळीसगाव येथे “गोदा ते नर्मदा” पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर जलयात्रेचे भव्य स्वागत!

April 29, 2026
Uncategorized

झुरखेडा येथे लोकनियुक्त सरपंचांचे आमरण उपोषण सुरू

April 16, 2026
Uncategorized

सकारात्मक पत्रकारितेचा गौरव : पत्रकार ईश्वर महाजन यांना “पॉझिटिव्ह जर्नालिझम अवॉर्ड 2025”

March 16, 2026
Uncategorized

शाळेत सोडण्याच्या बहाण्याने नेत विद्यार्थीनीवर अत्याचार

March 6, 2026
Uncategorized

भुसावळ अमृत पाणीपुरवठा योजनेच्या रखडलेल्या कामावरून एकनाथराव खडसे आक्रमक; विधान परिषदेत सरकारला धारेवर धरले

March 1, 2026
Uncategorized

वासुदेव जेष्ठ नागरिकासंघाचे सवलतीत तीर्थाटन

March 1, 2026
Next Post

संतापजनक : आजीकडे आलेल्या अल्पवयीन बहिणीवर चुलत भावाकडूनच जबरदस्तीचा प्रयत्न !

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

POPULAR NEWS

…म्हणून मी सरस्वतीच्या मृतदेहाचे तुकडे केले, सानेच्या दाव्याने हत्याकांडाला नवीन कलाटणी !

June 9, 2023

भल्यापहाटे पोलीस अधिकाऱ्याने पत्नी अन् पुतण्याला गोळ्या घातल्या ; नंतर स्वतः ही उचललं टोकाचे पाऊल !

July 24, 2023

धक्कादायक ! निर्जनस्थळी प्रेमी युगलाचा रोमान्स ; शारीरिक संबंध ठेवताना अल्पवयीन तरूणीचा जागीच मृत्यू !

March 27, 2023

अपघाताचा बनाव करून पतीनेच‎ पत्नीला कारमध्ये जिवंत जाळल्याचे उघड ; कारण वाचून तुम्हाला बसेल धक्का !

June 29, 2023

किरीट सोमय्या यांचा व्हायरल व्हिडिओ खरा की खोटा? ; पोलीस तपासात समोर आली मोठी माहिती !

July 26, 2023

EDITOR'S PICK

बोरगाव हत्याकांडासारख्या घटनांचा अभ्यास करण्यासाठी समिती नेमणार; ॲड पाडवी

November 7, 2020

‘मी आज भाजपात प्रवेश करतोय’ ; माजी नगरसेवकाचे वक्तव्य ऐकून एकनाथ शिंदे चकित !

November 26, 2021

धरणगाव : दुचाकी अपघातात जखमी तरुणाचा उपचारादरम्यान मृत्यू !

July 17, 2024

पिंपळे बुद्रुक शाळेत शाळा पूर्वतयारी मेळावा

April 19, 2022
ADVERTISEMENT

About

The Clear News

१४ सप्टेंबर २०२० रोजी 'द क्लिअर न्यूज'ची अधिकृत सुरुवात झाली आहे. सोशल मिडियाच्या युगात अवघ्या काही क्षणात बातम्या, माहिती सर्वसामान्य माणसांपर्यंत पोहचवली जात असली तरी आपल्या मनात सर्वात मोठा प्रश्न उभा राहतो, तो म्हणजे सोशल मीडियात आलेली बातमी, माहिती ही वस्तुनिष्ठ आणि सत्यार्थी आहे का? वाचकांच्या मनातील या प्रश्नाचे उत्तर आहे ,'द क्लिअर न्यूज'...!! हो, तुमचे,आमचे ,सर्वांचे अत्यंत विश्वासार्ह असे डिजिटल न्यूज चॅनल...!!

Follow us

© . Powered by ContentOcean Infotech

No Result
View All Result
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक

© . Powered by ContentOcean Infotech

error: Content is protected !!
Join WhatsApp Group