बोदवड (प्रतिनिधी) पशुधनाची अवैध वाहतूक प्रकरणात पोलिसांनी कुठलीही कारवाई केली नाही, तसेच तक्रार करणाऱ्या कार्यकर्त्यांना असभ्य वागणूक दिल्याच्या निषेधार्थ सोमवारी बोदवड येथे हिंदुत्ववादी संघटनांतर्फे तहसील कार्यालयावर मोर्चा काढण्यात आला.झालेल्या चर्चेत समाधानी न झालेल्या आंदोलनकर्त्यांनी तहसील कार्यालयाच्या आवारातच ध्वजस्तंभाजवळ ठिय्या मारून उपोषणाला सुरवात केली.
परिसरात मोठ्या प्रमाणावर गो तस्करी होते मात्र पोलिस अधिकारी,कर्मचारी हे बेजबाबदारपणे वागत असल्याकारणाने ते राजरोसपणे सुरू आहेत व सर्वांचे निदर्शनास आणून दिल्यास त्याविषयी तक्रार केल्यास गोरक्षक यांना पोलिसांकडून मारहाण केली होती,मध्यंतरी झालेला प्रकार तसाच आहे त्याला कुठेतरी आळा घालावा असे निवेदनात म्हटले आहे,मोर्चा ११ रोजी बोदवड तहसील कार्यालयावर निघाला होता मात्र समानधारक कारवाई न झाल्याने, हिंदू गो रक्षक संजय शर्मा गोरक्षकांचे मोर्चाचे उपोषणामध्ये रूपांतर झाले आहे.
या मोर्चेकऱ्यांनी पोलिसांकडून मारहाण झालेल्या गोरक्षा सामाजिक संस्थेच्या गोरक्षकांची तक्रार घेणे. पोलिस निरीक्षक राजेंद्र गुंजाळ, पोलीस कर्मचारी शशिकांत शिंदे यांच्याकडून झालेल्या मारहाण व गैर व्यवहारामुळे यांना सेवेतून बडतर्फे करणे,कत्तलखाने उध्वस्त करणे.सदर वाहना विषयी झालेल्या तक्रारीवरून वाहन जप्त करणे.तसेच संबंधितांवर गुन्हा दाखल करणे अश्या मागण्या केल्या आहेत. धुळे येथील छत्रपती शिवाजी महाराज गोरक्षक समिती जनआंदोलनाचे प्रांतीय अध्यक्ष संजय रामेश्वर शर्मा, भाजपाचे गणेश शर्मा, अमोल शिरपूरकर आदी सहभागी झाले आहेत.