बोदवड(प्रतिनिधी) फेब्रुवारी २२-२३ या शैक्षणिक वर्षात झालेल्या माध्यमिक शालांत प्रमाणपत्र परीक्षेत पुन्हा एकदा बोदवड एज्युकेशन सोसायटी संचलित न .ह. रांका हायस्कूल व कनिष्ठ महाविद्यालयाने घवघवीत यशाची परंपरा कायम राखली.
यावर्षी एकूण ३६२ विद्यार्थी विद्यार्थिनी परीक्षेस प्रविष्ट झाले होते. त्यापैकी ३१९ विद्यार्थी-विद्यार्थिनी उत्तीर्ण झालेत. विद्यालयाचा एकूण निकाल ८८.१२ टक्के इतका लागला असून कु.वैष्णवी अनिल कोल्हे व कु गायत्री दिलीप तेली या दोघींनी ९२.८० टक्के गुण मिळवून प्रथम क्रमांकाचा मान मिळविला . कु.भारती किशोर वंजारी हिने ९२.७० टक्के गुण मिळवून द्वितीय क्रमांक पटकावला. तसेच कु. प्रियंका प्रवीण कदम हिने तृतीय क्रमांक पटकावला. तसेच ९० टक्क्यांच्यावर सात विद्यार्थी विद्यार्थिनींनी गुण मिळवून यशाची परंपरा कायम राखली.
सर्व यशस्वी विद्यार्थ्यांचे संस्थेचे अध्यक्ष मिठूलालजी अग्रवाल, उपाध्यक्ष अजय जैन, सचिव विकासजी कोटेचा, माजी अध्यक्ष प्रकाशचंद सुराणा व सर्व संचालक मंडळ तसेच मुख्याध्यापक पी.एम. पाटील, उपमुख्यध्यापिका एम.एस. बडगुजर, उपप्राचार्या, एम.टी. नेमाडे, पर्यवेक्षक आर.के. तायडे, जे.एन. माळी आणि सर्व शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी बंधू भगिनी यांनी विद्यार्थ्यांच्या यशाबद्दल अभिनंदन व कौतुक केले तसेच पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्यात.