जळगाव (प्रतिनिधी) राहत्या घराचे दरवाजाचा कडीकोंडा कापुन चोरट्यांनी प्रवेश केला. कपाटातील सामान अस्तव्यस्त करत सुमारे १ लाख ९३ हजार १८३ रुपयांचा मुद्देमाल चोरुन नेला. जुना खेडीरोडवरील साईगिता नगरात ही धाडसी घरफोडी शनिवारी सकाळी उघडकीस आली.
ओम गोपालसिंग चव्हाण (वयः २८, रा. प्लॉट नं.१८, साइगिता नगर) येथे कुटुंबासह वास्तव्यास आहेत. घराचा दरवाजा बंद होता. चोरट्यांनी कडी-कोंडा कापुन आतमध्ये एन्ट्री केली. सर्वत्र मुद्देमालाचा शोध घेतला. कपाटातील सामान अस्तव्यस्त करत सोने-चांदीचे दागिने घेत चोरटे फरार झाले. १८ नोव्हेबर रात्री ते शनिवार दरम्यान ही घटना घडली. कुटुंबिय घरी परतल्यानंतर प्रकार उघडकीस आला. याप्रकरणी तक्रारीनुसार शनिपेठ पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला. पोलीस उपनिरीक्षक कावेरी कमलाकर, पोलीस उपनिरीक्षक योगेश ढिकले यांनी घटनास्थळी जावुन पाहणी केली. तसेच प्रकार जाणुन घेतला. परिसरात सीसीटीव्ही कॅमेऱ्याचा शोध घेऊन फुटेज ताब्यात घेण्याच्या तपासाला गती दिली जाईल, असे सुत्रांकडून सांगण्यात आले. तसेच पुढील तपास सहायक फौजदार रघुनाथ पवार हे करीत आहे.
















