मुंबई (वृत्तसंस्था) बॉलिवूड अभिनेत्री कंगना रनौतला कोरोनाची लागण झाली आहे. आपल्याला कोरोनाची लागण झाली असून हिमाचल प्रदेशमध्ये क्वारन्टाईन असल्याची माहिती तिने आपल्या इन्स्टाग्रामवरुन दिली आहे. या काळात आपण कोरोनाच्या सर्व नियमांचे पालन करत असल्याचंही तिने सांगितलं आहे.
कंगनाने आपल्या सोशल मीडियातील पोस्टमध्ये लिहिलंय की, “मी स्वत:ला क्वारन्टाईन करुन घेतलंय. मला माहित नव्हतं की हा व्हायरस माझ्या शरीरात पार्टी करत आहेत. आता मी त्याला संपवणार आहे. आपण कोणीही अशा गोष्टींना थारा देऊ नका. जर आपण या गोष्टीला घाबरलो तर ते आपल्याला जास्त घाबरवतील. कोरोना हा फक्त एक फ्लू आहे, ज्याने काही लोकाच्या मनामध्ये भीती निर्माण केली आहे. आपण त्याला संपवून टाकू. हर हर महादेव”
बॉलिवूडमध्ये अनेकजण कोरोनाशी दोन हात करत आहेत. यामध्ये अनेक दिग्गजांचा समावेश आहे. दरम्यान आता अभिनेत्री कंगना रनौत देखील कोरोना पॉझिटिव्ह आढळून आल्याने तिचे चाहते सोशल मीडियावर कंगनासाठी प्रार्थना करत आहेत. सध्या ट्विटरपासून दूर असणाऱ्या कंगनाने इन्स्टाग्रामवर पोस्ट करत ती कोरोना पॉझिटिव्ह असल्याची माहिती दिली आहे.