पिंपरी चिंचवड (वृत्तसंस्था) पिंपरी चिंचवडमधील मध्यवस्तीत असलेल्या कोहिनूर इमारतीच्या परिसरामध्ये खोदकाम सुरू असताना बॉम्ब आढळून आल्यामुळे एकच खळबळ उडाली आहे.
पोलीस घटनास्थळी दाखल झाले असून असून पुढील तपास सुरू आहे. पोलिसांनी हा बॉम्ब ताब्यात घेऊन तो बॉम्बनाशक पथकाकडे सोपवला आहे. सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे हा बॉम्ब जिवंत आहे की नाही?, याबाबत बॉम्बनाशक पथकाचा शोध सुरू आहे. दरम्यान या घटनेमुळे नागरिकांमध्ये प्रचंड भीतीचे वातावरण पसरले आहे.