जळगाव (प्रतिनिधी) विधानसभा निवडणुकीत सहानुभूती मिळावी यासाठी अपक्ष उमेदवार अपक्ष उमेदवार शेख अहमद शेख हुसेन गुलाम हुसेन यांनी आपल्याच घरावर दोन्ही मुले आणि नातेवाईकांच्या मदतीने गोळीबार केल्याची घटना घडली होती. याप्रकरणात तीन जणांना अटक करण्यात आले होते. तर दोघं फरार होते. उर्वरित फरार झालेल्या दोघांना देखील जळगाव स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने मालेगाव येथून अटक केली आहे.
मोहम्मद शफिक शेख अहमद उर्फ बाबा आणि शेख उमर फारूक अहमद हुसेन, अशी अटक केलेल्या दोघांची नावे आहेत. दोघां संशयिताना न्यायालयात हजर केले असता दोघांना १० डिसेंबरपर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे. जळगाव शहर विधानसभा निवडणुकीतील अपक्ष उमेदवार शेख अहमद शेख हुसेन गुलाम हुसेन हे निवडणुकीच्या रिंगणात उभे होते. दरम्यान प्रचार काळात त्यांनी आपल्याला सहानभूती मिळावी, यासाठी दोन्ही मुले, शालक आणि त्याचा मित्र यांच्या मदतीने १८ नोव्हेंबर रोजी पहाटे ४ वाजता मोटरसायकलवर घेऊन गोळीबार केला होता. याप्रकरणी एमआयडीसी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता.
जळगाव स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने गुन्ह्याची चौकशी केली असता यामध्ये निवडणुकीत उभे असलेला अपक्ष उमेदवार शेख अहमद शेख असेल यानेच त्याचा मुलगा शिबान फाईज अहमद हुसेन आणि दुसरा मुलगा शेख उमर फारुख अहमद हुसेन यांच्यासह नातेवाईक इरफान अहमद मोहम्मद हुसेन आणि मोहम्मद शफिक शेख अहमद उर्फ बाबा यांच्या मदतीने हा गोळीबार केल्याचे निष्पन्न झाले. त्यानुसार स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने ५ डिसेंबर रोजी या पाचपैकी अपक्ष उमेदवार शेख अहमद शेख हुसेन यांच्यासह त्याचा मुलगा शिबान फाईज अहमद हुसेन आणि नातेवाईक इरफान अहमद मोहम्मद या तिघांना अटक करण्यात आली होती. तर यातील मोहम्मद शफिक शेख अहमद उर्फ बाबा आणि शेख उमर फारूक अहमद हुसेन हे फरार झाले होते.
दरम्यान, हे दोन्ही आरोपी मालेगाव येथे असल्याची गोपनीय माहिती जळगाव स्थानिक गुन्हे शाखेचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक बबन आव्हाड यांना मिळाली. त्यानुसार त्यांनी पथकाला कारवाई करण्याच्या सूचना दिल्या. पथकाने रविवारी ८ डिसेंबर रोजी मालेगाव येथून फरार झालेल्या संशयित आरोपी मोहम्मद शफीक शेख अहमद उर्फ बाबा आणि शेख उमर फारूक अहमद हुसेन दोन्ही राहणार मालेगाव यांना अटक केली. त्यांच्याकडून गुन्ह्यात वापरलेली मोटरसायकल आणि गावठी कट्टा जप्त करण्यात आला आहे.
पोलीस अधीक्षक महेश्वर रेड्डी, अप्पर पोलीस अधीक्षक अशोक नखाते, उपविभागीय पोलिस अधिकारी संदीप गावित यांच्या सुचनेनुसार आणि वरिष्ठ पोलीस निरीक्षक बबन आव्हाड यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक दत्तात्रय पोटे, सहायक फौजदार विजयसिंह पाटील, सहाय्यक फौजदार अतुल वंजारी, पोलीस कॉन्स्टेबल अक्रम शेख, हरिलाल पाटील, राहुल पाटील, ईश्वर पाटील भरत पाटील यांनी केली आहे.