धरणगाव (प्रतिनिधी) संजय नगर परिसरातील शहराचे ग्रामदैवत असलेल्या मरीआईच्या मंदिरातील दानपेटीसह चोरट्यांनी चिंतामणी मोरया परिसरात किराणा दुकान फोडल्याची घटना आज सकाळी उघडकीस आली. एकाच रात्रीतून दोन चोऱ्या झाल्यामुळे नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण पसरले आहे. दरम्यान, मंदिराच्या सीसीटीव्ही फुटेजमध्ये चोरटे कैद झाले आहेत.
शहराचे ग्रामदैवत असलेल्या मरी आईच्या मंदिरात मध्यरात्री तीन वाजेच्या सुमारास चोरट्यांनी चांदीचे नाणे व दानपेटीतील रक्कम लंपास केल्याचे आज सकाळी उघडकीस आले. याठिकाणी चोरटे सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाले आहेत. सीसीटीव्हीचे फुटेज नुसार पाच ते सहा चोरटे असून तोंडाला रुमाल बांधलेला दिसून येत आहे. त्याचबरोबर चिंतामण मोरया परिसरातील किराणा दुकानातून सुमारे दहा हजारापर्यंतचा सामान लंपास केलेला आहे. शेवटचे वृत्त हाती आले तेव्हा धरणगाव पोलीस स्थानकात गुन्हा दाखल करण्याची कारवाई सुरु होती.