मुंबई (वृत्तसंस्था) लोकसभेच्या निवडणुकीची तारीख ही 16 एप्रिल ठरल्याचे निवडणूक आयोगाचे एक पत्र सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. मात्र, निवडणुक आयोगाच्या अधिकाऱ्यांकडून हा दावा फेटाळण्यात आला आहे. प्रशासनाच्या तयारीसाठी अंदाजे 16 एप्रिल ही तारीख निवडल्याचं स्पष्टीकरण निवडणूक आयोगाकडून देण्यात आलं आहे.
व्हायरल होत असलेल्या पत्रात नेमकं काय लिहिलंय?
निवडणूक आयोगाने तात्पुरता मतदानाचा दिवस 16 एप्रिल 2024 घोषित केला आहे. अधिसूचना दिल्लीच्या सर्व 11 जिल्हा निवडणूक अधिकाऱ्यांना जारी करण्यात आली होती. त्यावर ‘भारतीय निवडणूक आयोगाच्या निवडणूक आराखड्यात दिलेल्या वेळेचे पालनपालन’ असे शीर्षक आहे. दिल्ली सीईओच्या कार्यालयाने थोड्याच वेळात ट्विटरवर पोस्ट केले आणि ती तारीख केवळ संदर्भासाठी होती, असे स्पष्टीकरण दिले.
दिल्ली निवडणूक आयोगाने जारी केलेल्या परिपत्रकाच्या संदर्भात मीडियाकडून काही प्रश्न उपस्थित करण्यात आले होते. ज्यामध्ये 16 एप्रिल 2024 ही लोकसभा निवडणुकीची संभाव्य तारीख आहे का? असे विचारण्यात आहे. त्यावर केंद्रीय निवडणूक आयोगाच्या (ECI) निवडणूक आराखड्यानुसार अधिकाऱ्यांनी उपक्रम आखण्यासाठी ही तारीख केवळ ‘संदर्भा’साठी नमूद केल्याचे स्पष्ट करण्यात आले आहे”, असं स्पष्टीकरण निवडणूक आयोगाने ट्विटमध्ये दिलं आहे.