मुंबई (वृत्तसंस्था) भाजप खासदार उन्मेश पाटील यांनी शिवसेना ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांची निवास्थानी भेट घेतल्यानंतर राऊत यांनी पत्रकारांसोबत संवाद साधला. खासदार उन्मेष पाटील ठाकरे गटात प्रवेश करण्याच्या विचारात असल्याचे मोठं वक्तव्य राऊत यांनी केल्यामुळे राजकीय वर्तुळात प्रचंड खळबळ उडाली आहे.
भाजप खासदार उन्मेश पाटील यांनी संजय राऊत यांची निवास्थानी भेट घेतल्यानंतर राऊत यांनी पत्रकारांसोबत संवाद साधला. राऊत म्हणाले की, खासदार उन्मेष पाटील ठाकरे गटात प्रवेश करण्याच्या विचारात आहेत. माझी भेट घेतल्यानंतर ते मात्रोश्रीवर उद्धव ठाकरे यांची भेट घेण्यासाठी गेल्याचेही राऊत यांनी सांगितले. उन्मेष पाटील यांच्या प्रवेशावर पत्रकारांनी विचारले असता त्यांनी उद्यापर्यंत वाट बघा, असेही राऊत यांनी म्हटले आहे.
भाजपचे जळगावमधील विद्यमान खासदार उन्मेष पाटील यांनी शिवसेना ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांची भेट घेतली. उन्मेश पाटील यांनी संजय राऊतांची मुंबईतील निवासस्थानी भेट घेतली. भाजपने जळगाव लोकसभा मतदारसंघात विद्यमान खासदार उन्मेश पाटील यांचं तिकीट कापून स्मिता वाघ यांना उमेदवारी जाहीर केली आहे. यामुळे भाजप खासदार उन्मेश पाटील नाराज असल्याची चर्चा आहे. ठाकरे गटात प्रवेश करण्यासंदर्भात उन्मेष पाटील यांनी संजय राऊत यांच्याशी प्राथमिक चर्चा झाली.