पुणे (वृत्तसंस्था) पुणे शहरातील दोन दिवसांतील सर्व नियोजित कार्यक्रम रद्द करीत विधानसभेतील विरोधी पक्षनेते अजित पवार शुक्रवारी अचानक ‘नॉट रिचेबल’ झाले आहेत. विशेष म्हणजे पक्षाचे ७ आमदारांचे फोन नोट रिचेबल असल्याने राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण आलं आहे.
अजित पवार यांचे दोन दिवसांचे कार्यक्रम जाहीर करण्यात आले होते. त्यानुसार त्यांनी दुपारपर्यंत कात्रज दूध संघातील पदाधिकाऱ्यांसोबत बैठका घेतल्या.जेवण झाल्यानंतर ते केशवनगर येथील त्यांच्या नियोजित कार्यक्रमासाठी रवानाही झाले. त्यांच्या वाहनांचा ताफा नियोजित कार्यक्रमाच्या अलीकडे दीड ते दोन किलोमीटर अंतरावर पोहोचला होता. त्यांच्या कारमध्ये ते, त्यांचे स्वीय सहायक आणि चालक असे तिघेच होते. त्यांची कार थांबली, त्या ठिकाणी त्यांनी नारळपाणीही घेतले.
फोनवर बोलत असताना त्यांनी अचानक आपले कार्यक्रम रद्द केले आणि ते पोलिस बंदोबस्त सोडून आपल्या खासगी दौऱ्यावर निघून गेले. पवार कुठे गेले आहेत, याची माहिती शुक्रवारी रात्रीपर्यंत त्यांच्या निकटवर्तीयांसह पोलिसांनाही नव्हती. अजित पवार आणि पक्षातील ७ आमदार देखील नॉट रिचेबल असल्याचे समोर आल्यानंतर सोशल मीडियावर एकच चर्चा रंगली आहे. अजित पवार आणि पक्षाचे ७ आमदारांचे फोन नोट रिचेबल असल्याने राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण आलं आहे. ते यापूर्वी २०१९च्या विधानसभा निवडणुकांपूर्वी असेच अज्ञातवासात गेल्याने त्यांच्या शुक्रवारच्या कृतीची चर्चा जोरदार रंगली होती.
दरम्यान, सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानिया यांनी देवेंद्र फडणवीस आणि अजित पवार यांच्या पहाटेच्या शपथविधीचा फोटो ट्वीट केला आहे आणि “किळसवाणं राजकारण मी पुन्हा येईन” असं कॅप्शन अंजली दमानिया यांनी दिलं आहे. त्यामुळे अजितदादा नॉट रिचेबल अशा बातम्यांना आणि चर्चांना चांगलंच उधाण आलं आहे.