नवी दिल्ली (वृत्तसंस्था) कर्नाटक विधानसभानिवडणूकांच्या तारखांची घोषणा केंद्रीय निवडणूक आयोगाचे प्रमुख राजीव कुमार यांनी आज सकाळी साडेअकरा वाजता पत्रकार परिषद घेऊन निवडणूक कार्यक्रम जाहीर केला. त्यानुसार, कर्नाटकमध्ये १० मे रोजी मतदान होणार आणि १३ मे रोजी निकाल लागणार आहेत.
निवडणुकीचा कार्यक्रम जाहीर झाल्यानंतर तातडीने आदर्श आचारसंहिता लागू करण्यात आली आहे. कर्नाटक विधानसभेच्या 224 जागांसाठी निवडणुका होणार आहेत. कर्नाटकात सध्या भाजपकडे 117, काँग्रेसकडे 69, जेडीएसकडे 32 आणि इतरांकडे सहा जागा आहेत.
असा आहे निवडणूक कार्यक्रम
उमेदवारी अर्ज दाखल करण्याची शेवटची तारीख – 20 एप्रिल 2023
उमेदवारी अर्ज छाननी तारीख – 21 एप्रिल 2023
उमेदवारी अर्ज मागे घेण्याची अखेरची तारीख – 24 एप्रिल 2023
मतदानाची तारीख -10 मे 2023
मतमोजणीची तारीख – 13 मे 2023