जळगाव (प्रतिनिधी) घोटाळ्यातील मुख्य संशयित तथा अवसायक जितेंद्र कंडारे याला पुणे आर्थिक गुन्हे शाखेच्या पथकाने इंदोरमधून थोड्यावेळापूर्वी अटक केली आहे. दरम्यान, कंडारेच्या अटकेमुळे बीएचआर घोटाळ्यातील अनेक महत्त्वपूर्ण गोष्टींचा उलगडा होण्याची शक्यता आहे.
मागील सात महिन्यापूर्वी आर्थिक गुन्हे शाखेच्या पथकाने बीएचआर घोटाळ्यात जळगाव शहरामध्ये धाडसत्र राबविले होते. यावेळी अनेक संशयितांना अटक झाली होती. परंतु मुख्य संशयित असलेला सुनील झंवर आणि अवसायक जितेंद्र कंडारे हा फरार होता. त्यामुळे आर्थिक गुन्हे शाखेच्या पथकाने राज्यासह परराज्यात देखील यांच्या शोधार्थ अनेक पथके पाठवली होती. परंतु दोघेजण पोलिसांना मागील सात महिन्यापासून गुंगारा देण्यात यशस्वी होत होते. परंतु आर्थिक गुन्हे शाखेच्या पथकाने मोठ्या शिताफीने सापळा रचून इंदोर मधून थोड्याच वेळापूर्वी कंडारेला अटक केली आहे.
दरम्यान, कंडारेच्या अटकेमुळे बीएचआर घोटाळ्यातील अनेक बाबींचा लवकरच उलगडा होण्याची शक्यता आहे.
विजय वाघमारे (9284058683)