नवी दिल्ली (वृत्तसंस्था) २५ आणि २६ ऑगस्टच्या रात्री जम्मू-काश्मीरपासून ते महाराष्ट्रापर्यंत भूकंपाचे धक्के जाणवले. भारताबाहेर म्हणजे अफगाणिस्तानमध्ये देखील भूकंपाचे धक्के जाणवले.
एएनआय वृत्तसंस्थेने दिलेल्या वृत्तानुसार, सर्वात आधी महाराष्ट्रातील कोल्हापूरमध्ये भूकंपाचे धक्के जाणवले. नॅशनल सेंटर फॉर सिस्मोलॉजीनुसार महाराष्ट्रातील कोल्हापूरात रात्री २.२१ मिनिटांनी भूकंपाचे धक्के जाणवले. त्याची तीव्रता रिक्टर स्केलवर ३.९ इतकी नोंदवण्यात आली. भूकंपाचे केंद्र १० किलोमीटर खोल होता.
महाराष्ट्रानंतर जम्मू-काश्मीरमध्ये भूकंपाचे धक्के जाणवले. नॅशनल सेंटर फॉर सिम्मोलॉजीनुसार जम्मू-काश्मीरमध्ये रात्री ३ वाजून २८ मिनिटांनी भूकंपाचे धक्के जाणवले. भूकंपाचे केंद्र कटरापासू ६२ किलोमीटर उत्तर पूर्वकडे ५ किलो मीटर अंतरावर होता. त्याची तीव्रता ३.४ इतकी नोंदवण्यात आली.
कोल्हापूरपासून १७१ किमी अंतरावरील भूकंपाची तीव्रता रिश्टर स्केलवर ३.९ इतकी होती. नॅशनल सेंटर फॉर सिस्मॉलॉजीनुसार, भूकंपाची खोली जमिनीखाली १० किमी होती. कोल्हापुरात सकाळी १२:०५ वाजता ३.४ तीव्रतेचा भूकंप झाला, ज्याची खोली जमिनीच्या खाली ५ किमी होती. या भूकंपाचा केंद्रबिंदू कोल्हापूरच्या पूर्वेला १७१ किलोमीटरवर आहे. यात कोणतीही हानी नसल्याची प्राथमिक माहिती आहे.केंद्रबिंदू कर्नाटकातील विजापूरजवळ आहे, अल्लमट्टी धरणाच्या जवळ केंद्रबिंदू असल्याने भीतीच वातावरण आहे.