TheClearNews.Com
Wednesday, March 18, 2026
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
No Result
View All Result
Morning News
No Result
View All Result

ब्रेकिंग न्यूज : निवडणूक आयोगाकडून ठाकरे गटाला आता फक्त उद्या दुपारी 2 पर्यंतची मुदत !

शिंदे गटाकडून निवडणूक आयोगात पोहोचले शपथपत्रांचे गठ्ठेच्या गठ्ठे !

The Clear News Desk by The Clear News Desk
October 7, 2022
in राजकीय, राज्य, राष्ट्रीय
0
Share on FacebookShare on Twitter

मुंबई (वृत्तसंस्था) अंधेरी पोटनिवडणुकीच्या पार्श्वभूमीवर शिवसेनेच्या निवडणूकचिन्हाची लढाई निवडणूक आयोगाच्या दारात सुरु झाली आहे. निवडणूक आयोगानं आता ठाकरे गटाला उद्या दुपारी 2 पर्यंत ठाकरे गटाला मुदत दिली आहे. दुपारी दोन वाजेपर्यंत त्यांना उत्तर सादर करावे लागणार आहे. तर दुसरीकडे शिंदे गटानं धनुष्यबाण चिन्हावर अधिकृत दावा केला आहे. या संदर्भात शिंदे गटाकडून निवडणूक आयोगाला प्रतिज्ञापत्र सादर करण्यात आले आहे. या प्रतिज्ञापत्रात शिवसेना पक्षअध्यक्ष पदाचा उल्लेख करण्यात आला आहे.

शपथपत्रांनी भरलेली कार दिल्लीतील निवडणूक आयोगामध्ये पोहोचली
शिवसेना पक्ष नेमका कुणाचा आणि धनुष्यबाण चिन्ह कुणाला मिळणार याचा निर्णय आता केंद्रीय निवडणूक आयोग ठरवणार आहे. यासाठी दोन्ही पक्षांना आपली बाजू मांडण्यासाठी मुदत देण्यात आली होती. या मुदतीनुसार आज शिंदे गटाकडून शपथपत्रांचे गठ्ठेच्या गठ्ठे निवडणूक आयोगात सादर करण्यात आले आहेत. शपथपत्रांनी भरलेली एक कार आज दिल्लीतील निवडणूक आयोगामध्ये पोहोचली आणि शिंदे गटाकडून जवळपास ७ लाख सदस्यांची शपथपत्र निवडणूक आयोगाला सुपूर्द करण्यात आल्याची प्राथमिक माहिती समोर आली आहे. या पत्रामध्ये शिवसेनेच्या पक्षअध्यक्ष पदावर शिंदे यांच्या वतीने दावा करण्यात आल्याची माहिती समोर आली आहे. त्यामुळे पक्षाबरोबरच पक्षअध्यक्ष पदही शिंदे ताब्यात घेण्याच्या प्रयत्नात दिसून येत आहे. आता निवडणूक आयोग शिवसेना कोणाची याचा निर्णय लवकर घेण्याची शक्यता देखील वर्तवण्यात येत आहे.

READ ALSO

जळगावच्या राजकारणात मोठा भूकंप: राष्ट्रवादी पक्षाच्या बड्या नेत्याचा पुत्र भाजपच्या वाटेवर!

घरकुल अनुदानात वाढ करून प्रलंबित कामे मार्गी लावा; आमदार एकनाथराव खडसेंची विधानपरिषदेत आक्रमक मागणी

ठाकरे गटाला उद्या दुपारी २ वाजेपर्यंतची अंतिम मुदत
दुसरीकडे ठाकरे गटाकडून कागदपत्रं सादर करण्यासाठी मुदतवाढीची मागणी करण्यात आली होती. पण निवडणूक आयोगानं आता ठाकरे गटाला उद्या दुपारी २ वाजेपर्यंतची अंतिम मुदत दिली आहे. त्यामुळे ठाकरे गटाला आता पुढच्या २१ तासांत कागदपत्र निवडणूक आयोगासमोर सादर करावी लागणार आहेत. दुसरीकडे आपल्या बाजूनं 40 आमदार, 12 खासदार, 144 पदाधिकारी, 11 राज्यप्रमुख असल्याचा दावा शिंदे गटानं आयोगासमोर केलेला आहे. सोबतच 1 लाख 66 हजार 764 प्राथमिक सदस्यत्वांची शपथपत्रंही सादर करण्यात आलीत.

ठाकरे गटानं आज पहिल्यांदाच आपलं प्राथमिक लेखी निवेदन आयोगात केलं सादर
आजवर दोनवेळा मुदतवाढ मागणाऱ्या ठाकरे गटानं आज पहिल्यांदाच आपलं प्राथमिक लेखी निवेदन आयोगात सादर केलं. शिंदे गटाची कागदपत्रं आम्हाला अद्याप मिळालेली नाहीत अशी तक्रार करत ठाकरे गटानं आज निवडणूक आयोगात आपली बाजू मांडली. बाजू मांडण्यासाठी ठाकरे गटाला आज शेवटची मुदत होती. पक्षावर अजूनही आमचं वर्चस्व आहे हे सांगतानाच सविस्तर कागदपत्रं सादर करण्यासाठी आपल्याला किमान 15 ते 20 दिवसांचा वेळ मिळावा ही मागणी ठाकरे गटानं केली होती. मात्र त्यांना उद्यापर्यंतची मुदत देण्यात आली आहे.

Share this:

  • Facebook
  • WhatsApp
  • Telegram
  • Twitter

Tags: #eknathshinde #shivsena #politices #updates #topnews#eknathshinde #shivsena #rajthackrey #uddhavthackrey #mahendrabhaushali

Related Posts

जळगाव

जळगावच्या राजकारणात मोठा भूकंप: राष्ट्रवादी पक्षाच्या बड्या नेत्याचा पुत्र भाजपच्या वाटेवर!

March 13, 2026
जळगाव

घरकुल अनुदानात वाढ करून प्रलंबित कामे मार्गी लावा; आमदार एकनाथराव खडसेंची विधानपरिषदेत आक्रमक मागणी

March 12, 2026
जळगाव

खडसेंचा विधानपरिषदेत सरकारवर प्रहार: नाशिकमधील ९ कोटींच्या अवैध गुटखा प्रकरणावरून प्रशासनाला धारेवर धरले

March 9, 2026
जळगाव

चाळीसगावच्या विकासाला अर्थसंकल्पातून मोठी चालना – २३८ कोटींची भरीव तरतूद!

March 7, 2026
जळगाव

नगरसेवक डायरी पुन्हा सुरू करा ; नगरसेविका वैशाली पाटील यांनी महापौर दीपमाला काळे यांना दिले निवेदन !

February 27, 2026
जळगाव

महाराष्ट्र भाजपची SIR समिती जाहीर; मंगेश चव्हाण यांच्यावर महत्त्वाची जबाबदारी !

February 24, 2026
Next Post

Horoscope Today : आजचं राशीभविष्य, शनिवार ८ ऑक्टोबर २०२२ !

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

POPULAR NEWS

…म्हणून मी सरस्वतीच्या मृतदेहाचे तुकडे केले, सानेच्या दाव्याने हत्याकांडाला नवीन कलाटणी !

June 9, 2023

भल्यापहाटे पोलीस अधिकाऱ्याने पत्नी अन् पुतण्याला गोळ्या घातल्या ; नंतर स्वतः ही उचललं टोकाचे पाऊल !

July 24, 2023

धक्कादायक ! निर्जनस्थळी प्रेमी युगलाचा रोमान्स ; शारीरिक संबंध ठेवताना अल्पवयीन तरूणीचा जागीच मृत्यू !

March 27, 2023

अपघाताचा बनाव करून पतीनेच‎ पत्नीला कारमध्ये जिवंत जाळल्याचे उघड ; कारण वाचून तुम्हाला बसेल धक्का !

June 29, 2023

किरीट सोमय्या यांचा व्हायरल व्हिडिओ खरा की खोटा? ; पोलीस तपासात समोर आली मोठी माहिती !

July 26, 2023

EDITOR'S PICK

मुंबईत आता वाहनांना मिळणार कलर कोड

April 17, 2021

गुवाहाटीत बंडखोर आमदारांमध्ये जोरदार वादावादी?, एकनाथ शिंदेंकडून शांततेचे आवाहन !

June 26, 2022

पुणे-जबलपूर उत्सव विशेष गाड्यांच्या फेर्‍या सुधारित संरचनेसह सुरू !

January 14, 2024

कोरोना रुग्णांसाठी मानियार बिरदारीचा दुसरा दिलासा

March 18, 2021
ADVERTISEMENT

About

The Clear News

१४ सप्टेंबर २०२० रोजी 'द क्लिअर न्यूज'ची अधिकृत सुरुवात झाली आहे. सोशल मिडियाच्या युगात अवघ्या काही क्षणात बातम्या, माहिती सर्वसामान्य माणसांपर्यंत पोहचवली जात असली तरी आपल्या मनात सर्वात मोठा प्रश्न उभा राहतो, तो म्हणजे सोशल मीडियात आलेली बातमी, माहिती ही वस्तुनिष्ठ आणि सत्यार्थी आहे का? वाचकांच्या मनातील या प्रश्नाचे उत्तर आहे ,'द क्लिअर न्यूज'...!! हो, तुमचे,आमचे ,सर्वांचे अत्यंत विश्वासार्ह असे डिजिटल न्यूज चॅनल...!!

Follow us

© . Powered by ContentOcean Infotech

No Result
View All Result
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक

© . Powered by ContentOcean Infotech

error: Content is protected !!
Join WhatsApp Group