नवी दिल्ली (प्रतिनिधी) ‘द हिंदू’ या वर्तमानपत्राने भाजपाचे केंद्रीय नेतृत्व पुढील वर्षी ‘एप्रिल-मे’मध्ये होणाऱ्या लोकसभा निवडणुकांसोबत (loksabha Vidhansabha Election 2024) विधानसभा निवडणूकही घेण्याच्या विचारात आहे. तसा प्रस्ताव प्रदेश भाजपानेच दिल्याचा बातमीत उल्लेख असल्यामुळे राज्याच्या राजकीय वर्तुळात चर्चेला उधान आले आहे.
‘द हिंदू’ने आपल्या बातमीत महाविकास आघाडी स्थापन केलेल्या विरोधी पक्षांच्या युती आणि शिवसेना पक्षात झालेली फुट यामुळे प्रदेश भाजपाने तसा प्रस्ताव दिल्याचे म्हटले आहे. भाजप प्रदेश नेतृत्वाला असे वाटतेय की, एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेसोबत नुकत्याच स्थापन झालेल्या युतीच्या अंतर्गत कारभाराचा मतदारांना सकारात्मक परिणाम होण्यात थोडा वेळ लागू शकतो. विधानसभा निवडणुकीची वेळ सार्वत्रिक निवडणुका घेतल्या तर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा प्रभाव आणि राष्ट्रीय मुद्दे देखील मतदारांना प्रभाव टाकतील. महाराष्ट्र भाजपनं दिलेल्या प्रस्तावावर केंद्रीय नेतृत्व सध्या विचार करत असल्याचे देखील ‘द हिंदू’ने आपल्या बातमीत म्हटले आहे.
दरम्यान, लोकसभा आणि विधानसभा निवडणुका एकत्र झाल्यास निवडणूक आयोग (Election Commission) आणि प्रशासन सज्ज असल्याची माहिती राज्याचे मुख्य निवडणूक अधिकारी श्रीकांत देशपांडे (Shrikant Deshpande) यांनी नुकतीच निवडणुकीच्या पूर्व तयारीचा आढावा घेण्यासाठी आले असतांना भंडाऱ्यात (Bhandara) दिली होती.