पिंपरी – चिंचवड (वृत्तसंस्था) चिंचवड (Chinchwad) विधानसभा पोटनिवडणूक मतदान केंद्रावर राडा झाल्याचे वृत्त समोर आली आहे. भाजप नगरसवेक सागर आंघोळकर आणि अपक्ष उमेदवार राहुल कलाटेंमध्ये धक्काबुक्की झाली असून पिंपळे गुरवमध्ये धक्काबुक्कीचा प्रकार घडला आहे. तर दुसरीकडे पोलिसांनी कोणतेही कारण नसताना शनिवारी (२५ फेब्रुवारी) रात्री उद्धव ठाकरे गटाच्या सैनिकांची आणि राष्ट्रवादी काँग्रेसच्या काही कार्यकर्त्यांची धरपकड केली. या कार्यकर्त्यांना कोणताही गुन्हा नसताना दोन ते चार तास पोलिस ठाण्यात बसवून ठेवण्यात आले होते.
पुणेकरांसाठी (Pune Bypoll Election) आजचा दिवस महत्त्वाचा आहे. कसबा (Kasba), चिंचवड (Chinchwad) पोटनिवडणुकीसाठी आज मतदान होणारय. या निवडणुकांमध्ये महायुती आणि महाविकास आघाडीची प्रतिष्ठापणाला लागली आहे. कसबा हा मतदारसंघ भाजपाचा बालेकिल्ला मानला जातो. गेले 30 वर्षे कसब्यावर भाजपचं वर्चस्व राहिलंय. त्यामुळे मतदार कोणाला कौल देतात हे पाहणं औत्सुकाचं ठरणार आहे.
चिंचवड विधानसभेच्या पोटनिडणुकीचे वातावरण चांगलेच तापले आहे. भाजप आणि महविकास आघाडी अशी थेट लढत रंगणार असल्याचे चित्र सध्या दिसत आहे. भाजपच्या उमेदवार अश्विनी जगताप या सहानभुती तसेच विकासाच्या मुद्द्यावर लढत आहे. तर, महाविकास आघाडीचे उमेदवार नाना काटे यांनी विकास तसेच महापालिकेत सुरू असणाऱ्या भ्रष्टाचाराच्या मुद्द्यावर निवडणूक लढवत आहेत.
दरम्यान, प्रचाराची सांगता झाल्यानंतर शुक्रवारी रात्री कमळाची चित्रे असलेल्या स्लीप आणि काही लाखांची रक्कम वाटप करताना लोक काही कार्यकर्ते सापडले. या कार्यकर्त्यांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. मात्र, त्यानंतर या कार्यकर्त्यांना ज्यांनी पकडून दिले त्यांनाही पोलिसांनी कोणतेही कारण नसताना पकडले. काही कार्यकर्त्यांना तर घरी जाऊन पकडले. त्यानंतर त्यांनां चिंचवड तसेच इतर पोलिस ठाण्यात बसवून ठेवले. राष्ट्रवादी आणि शिवसेना पक्षाचे कार्यकर्त्यांना पकडल्याचे कळतं आहे. दरम्यान, निवडणुकीचे काम करता येऊ नये, यासाठीच पोलिसांनी सत्ताधारी पक्षाच्या सांगण्यावरून आम्हाला डांबून ठेवल्याचा आरोप शिवसेना, राष्ट्रवादी काँग्रेसचे कार्यकर्ते करत आहेत.