रत्नागिरी (वृत्तसंस्था) केंद्रीय मंत्री नारायण राणे यांना पोलिसांनी अटक केल्याची प्राथमिक माहिती समोर येत आहे. दरम्यान, आज राणेंचा अटकपूर्व जामीन रत्नागिरी न्यायालयाने फेटाळून लावला होता.
केंद्रीय मंत्री नारायण राणे यांनी राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याविरोधात आक्षेपार्ह वक्तव्य केलं होतं. या वक्तव्याचे पडसाद संपूर्ण महाराष्ट्रात उमटले होते. नारायण राणे यांनी राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या कानशिलात लगावली असती असं वक्तव्य केलं. या वक्तव्याचे पडसाद संपूर्ण महाराष्ट्रात उमटले. नाशिक, पुणे, महाडसह अनेक ठिकाणांहून केंद्रीय मंत्री नारायण राणे यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला. दरम्यान, पोलिसांनी नारायण राणेंना दाखल झालेल्या सर्व गुन्ह्यांची माहिती देण्यात आली होती. कोणते कलम लावण्यात आले याची माहिती देण्यात आली. नाशिक पोलिसांनी नोंदवला होता गुन्हा. दिवसभरापासून नारायण राणेंच्या अटकेबाबत चर्चा सुरू होती.