ठाणे (वृत्तसंस्था) ठाणे महानगर पालिकेचे आरोग्य अधिकारी डॉ. राजू मुरुडकर यांना ५ लाख रुपये घेताना लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या ठाणे पथकाने रंगेहात अटक केली आहे. गुरुवारी संध्याकाळी ही कारवाई करण्यात आली. तसेच त्यांनी एका कंपनीकडून १५ लाखाची मागणी केली होती. ती कंपनी ठाणे महानगरपालिकेला व्हेंटिलेटर पुरवणार होती.
ठाणे महानगरपालिकेचे मुख्य वैद्यकीय अधिकारी डॉक्टर राजू मुरुडकर यांनी एका व्हेंटिलेटर कंपनीच्या व्हेंटिलेटर मशीन खरेदी प्रकरणी १५,००,००० रुपयांची लाच मागितली होती. तीस वेंटिलेटर मागे दहा टक्के लाच मागितली होती. या पंधरा लाख रुपयांपैकी पाच लाख रुपये डॉक्टर राजू मुरुडकर यांनी ऐरोलीतील लाईफलाईन रुग्णालयात घेतले. हे पैसे घेत असताना ठाणे लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या पथकाने सापळा लावून डॉक्टर राजू मुरुडकर यांना रंगेहात अटक केली आहे. त्यांना उद्या न्यायालयात हजर केले जाणार आहे.