जयपूर (वृत्तसंस्था) गरज पडली तर रद्द करण्यात आलेले कृषी कायदे पुन्हा आणणयात येतील, असं वादग्रस्त विधान राजस्थानचे राज्यपाल कलराज मिश्र यांनी केल्यामुळे खळबळ उडाली आहे.
राज्यपाल मिश्र यांनी भदोही इथं माध्यमांशी संवाद साधताना म्हणाले की, तीन कृषी कायदे मागे घेतले ही सकारत्मक दृष्टीने उचलेले पाऊल आहे. सरकारने शेतकऱ्यांना समजावून सांगण्याचा प्रयत्न केला. मात्र, शेतकरी हे कायदे रद्द करण्यावर अडून बसले. हे तीनही कायदे शेतकऱ्यांच्या हिताचे होते. सरकारला असे जाणवले की हे कायदे मागे घ्यायला हवेत. आता अनुकूल वेळ नाही. हे कायदे पुन्हा येऊ शकतात. शेतकरी मागे हटण्यास तयार नव्हते त्यामुळे हे कायदे मागे घेतले.
खासदार साक्षी महाराज म्हणाले, कृषी कायदे मागे घेणे ही काही मोठी घटना नाही. कायदे आणले जातात, मागे घेतले जातात. राजेश टिकैत असू दे अगर कुणी असू द्या काहीच फरक पडत नाही. देशाचा मोदींवर भरवसा आहे. शेतकऱ्यांचा मोदींवर भरवसा आहे. मोदी जे करतील ते राष्ट्रहिताचे करतील. हिदूस्थानच्या राजकारणाने ज्यांना नाकारले आहे ते राजकारणातील पप्पू राहुल गांधी आणि प्रियांका गांधी यांचे नाव घेण्याचे औचित्य नाही. कुणात जर ताकद आहे तर २०२२ समोर आहे. मैदानात या आणि लढा. अखिलेश यादव पिसाळलेल्या माजरासारखे खांब कुरतडत आहे, असेही ते म्हणाले.
दरम्यान, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी शुक्रवारी राष्ट्राला संबोधित करत तिन्ही कृषी कायदे रद्द करण्याची घोषणा केली. पंतप्रधान मोदींनी सांगितलं की आम्ही शेतकऱ्यांना समजावू शकलो नाही, म्हणून हे कायदे मागे घेत आहोत. मोदींच्या या निर्णयानंतर शेतकरी संघटना आणि भाजपाविरोधी पक्ष सरकारच्या हेतूवर शंका घेत आहेत, तर काही जण मात्र हे कायदे पुन्हा लागू करण्याची मागणी करत आहेत.