जळगाव (प्रतिनिधी) सोने-चांदीच्या दुकानात सराफा व्यावसायिकाला मारहाण केली. त्यानंतर दुकानातून ८ हजार रुपयांच्या रोकडसह १५ हजाराच्या चांदीच्या वस्तू तीन जणांनी जबरीने चोरून नेल्या. ही घटना दि. ४ जानेवारी रोजी पिंप्राळा परिसरातील साई अलंकार दुकानात घडला. या प्रकरणी तीन जणांविरुद्ध रामानंद नगर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
शहरातील दांडेकरनगरमधील रहिवासी भगवान हरि विसपुते यांचे पिंप्राळा बाजार परिसरात साई अलंकार नावाचे दुकान आहे. ते व त्यांचा मुलगा जसवीन हे दुकानात असताना तेथे गोलू उर्फ नितेश जाधव, यश पाटील, विशाल पाटील (पूर्ण नाव समजू शकले नाही) हे तिघे जण दुकानात गेले. तेथे त्यांनी पिता-पूत्राला मारहाण करून काउंटरमधील रोख आठ हजार रुपये व १५ हजार रुपये किमतीच्या चांदीच्या वस्तू असा एकूण २३ हजार रुपयांचा मुद्देमाल बळजबरीने हिसकावून घेऊन गेले. या प्रकरणी भगवान विसपुते यांनी रामानंद नगर पोलिस ठाण्यात फिर्याद दिली. त्यावरून तीन जणांविरुद्ध जबरी चोरीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तपास उपनिरीक्षक सचिन रणशेवरे हे करीत आहे
















