धरणगाव (प्रतिनिधी) शहरातील पारधी वाड्यात एका दिवसात अज्ञात चोरट्यांनी तीन घरे फोडून रोख रक्कम व दागिन्यांचा ऐवज लांबविल्याची घटना बुधवारी रोजी पहाटे ३ वाजण्याच्या सुमारास उघडकीस आली.
धरणगाव शहरातील पारधी वाडा येथे एकाचवेळी तीन ठिकाणी घरफोडी करण्यात आली. याबाबत मधुकर एकनाथ दाभाडे (पारधी वाडा, धरणगाव) यांनी म्हटले आहे की, बुधवारी पहाटे ३ वाजण्याच्या सुमारास घरात सर्वजण झोपलेले असताना अज्ञात दोन ते तीन जण घरात घुसले. यावेळी चोरट्यांनी घरातील आई, वडील व मुलगा हे झोपले असताना रुमाल लावून त्यांना बेशुद्ध केले. लोखंडी कपाटातील २० हजार रुपयांची रोकड, चांदीचे ब्रेसलेट असा मुद्देमाल लांबवला. याच परिसरातील इतर दोन ठिकाणी चोरी केली; परंतु चोरट्यांच्या हाती काहीच लागले नाही.