चाळीसगाव (प्रतिनिधी) शहरातील मालेगाव रोडवरील घरफोडून अज्ञात चोरट्यांनी सोने-चांदीच्या दागिन्यासह रोकड लंपास केली आहे.
या संदर्भात अधिक असे की, योगेश सीताराम सूर्यवंशी (नौकरी सीआरपीएफ) यांचे मालेगाव रोडवरील रामकृष्ण नगरात घर आहे. अज्ञात चोरट्यांनी २० ते २६ जानेवारीच्या दरम्यान केव्हा तरी घराचा मुख्य दरवाजाचे कुलूप तोडून घरात प्रवेश केला. त्यानंतर बेडरूममधील ९५ हजार रुपये किंमतीची २० ग्रॅम सोन्याचे मंगळसूत्र, ७ ग्रॅमची सोन्याची अंगठी, ३ भारच्या चांदीच्या २ साखळ्या आणि रोकड असा ऐवज लंपास केला. याप्रकरणी अज्ञात चोरट्यांविरुद्ध भादवि कलम ३८०,४५४, ४५७ गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील पोहेकॉ किशोर सोनवणे हे करीत आहेत.
















