धरणगाव (प्रतिनिधी) येथील चिंतामण मोरया नगरात एका अज्ञात चोरट्याने बंद घर फोडत सोन्यासह रोकड असा ५० हजार रुपयांचा ऐवज लंपास केल्याची घटना उघडकीस आली आहे. याप्रकरणी धरणगाव पोलीस स्थानकात अज्ञात चोरट्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
याबाबत अधिक माहिती अशी की, चिंतामण मोरया नगरात सेवानिवृत्त शिरीष भालचंद्र जोशी हे त्यांच्या परिवारासोबत राहतात. ते बाहेरगावी गेलेले असताना एका अज्ञात चोरट्याने दि. २९ जानेवारी रोजी पहाटे ५.३० वाजेच्या सुमारास बंद घराचे कुलूप तोडून ३ सोन्याचे कॉईन (३०,०००) आणि २० हजार, असा एकूण ५० हजार रुपये किंमतीचा मुद्देमाल चोरी केला. याप्रकरणी धरणगाव पोलीस स्थानकात अज्ञात चोरट्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास पोलीस हेडकॉन्स्टेबल चंदुलाल सोनवणे हे करीत आहेत.