भुसावळ (प्रतिनिधी) तालुक्यातील वरणगाव रोडवरील गोलानी कॉम्प्लेक्स परिसरातील रहिवाशी शुक्रवारी सकाळी घर बंद करून खाजगी कामासाठी बाहेर गावी गेले असता चोरट्यांनी यांचा फायदा घेऊन बंद घरातून भरदिवसा चोरट्यांनी सोन्याचे दागिने व रोकड लंपास केल्याची घटना शुक्रवार रात्री उघडकीस आली. याप्रकरणी बाजारपेठ पोलीस स्टेशनला गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
सविस्तर वृत्त असे की, फिर्यादी मुनिर लतीफ खान रेल्वे सेवानिवृत्त चीफ ओ.एस.राहणार वरणगाव रोड गोलानी कॉम्प्लेक्स परिसरात यांनी दिलेल्या फिर्यादीवरून दिनांक १६/७/२०२१ रोजी विदेशातून भाऊ (साला) चारचाकी वाहन घेऊन भुसावळ येथील गोलानी कॉम्प्लेक्समध्ये आला व पती-पत्नी व साला असे सकाळी ८:०० वाजेच्या सुमारास घर बंद करून बडनेरा येथे चारचाकी वाहनाने रवाना झाले. होकापुरी एक्सप्रेसने रात्री ९:०० वाजेच्या दरम्यान गोलानी कॉम्प्लेक्स येथे घरी पोहचले असता घराच्या दरवाजाचे कडी-कोंडा वाकवून कुलूप जमिनीवर तुटलेल्या अवस्थेत दिसले. घरात आत प्रवेश केला असता हॉल व बेडरूम मधील समान अस्थावस्त अवस्थेत आढळून आले. तसेच कपाटातील सोन्याचे दागिने लंपास करून दागिन्यांचे रिकामे बॉक्स जमिनीवर पडून होते. तिजोरीत असलेले रोख रक्कम २ लाख रुपये, सोन्याचे चपला हार २ तोळे, सोन्याची फॅन्सी पोत ८ ग्रॅम, कानातील झुमके व साखळी १५ ग्रॅम, अंगठी तीन ७ ग्रॅम, एक लॅपटॉप, डायमंड हार, बँटेक्स सेट, फॅनडी कंपनीची घड्याळ, नवीन विदेशातून आणलेल्या दोन बॅग असे एकूण अंदाजे ४ लाख ५० हजार रुपयांचे ऐवज अज्ञात चोरट्यांनी लंपास केल्याची माहिती अफसा तरन्नुम मुनिर खान यांनी दिली.
सदर घटनेची माहिती मिळताच बाजारपेठ पोलीस स्टेशनचे अधिकारी व कर्मचारी रात्री घटनास्थळी पोहचून पाहणी केली व सकाळी डॉग स्कॉटला पाचारण करण्यात आले.