जळगाव (प्रतिनिधी) शहरातील इच्छादेवी पोलिस ठाण्यामागील तांबापुरा-फुकटपुरा भागातील किराणा व्यावसायिक फरजाना आसिफ खान आपल्या कुटुंबासमवेत बाहेर गावी गेले असतांना अज्ञात चोरट्याने घरात घुसून रोख रक्कम व सोन्या-चांदीचे दागिने असा एकुण १ लाख ९३ हजार रुपयांचा ऐवज लंपास केला. याप्रकरणी एमआयडीसी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
शहरातील तांबापुरा भागातील फरजानाबी आसीफ खान या शुक्रवार (ता.२९) रोजी घरबंद करुन कुटूंबीयांसह पाचोरा येथे नात्यातील लग्नासाठी गेले होते. दोन दिवस लग्नात असतांना आज सकाळीच शेजारील रमीजा काकर यांनी फोन करुन तुमचे घराचे दार उघडे असल्याचे कळवले. त्यावरुन त्यांना घरात जावुन बघण्यास सांगीतल्यावर चोरी झाल्याचे निदर्षनास आले. चोरट्यांनी घराच्या मुख्यदाराचा कडीकोयंडा तोडून आत प्रेवश केला. घरातील साहित्य अस्तव्यस करुन कपाटातील ७२ हजार रुपये रोख सोने चांदिचे दागिने असा एकुण १ लाख ०३ हजार ६०० रुपयांचा ऐवज चोरट्यांनी लांबवला. फरजाना बी यांनी तत्काळ लग्न कार्यसोडून पाचोरा येथून घराकडे धाव घेतली घरी आल्यावर त्यांना सर्व प्रकार लक्षात आल्यावर त्यांनी एमआयडीसी पेलिसांना घटनेची माहिती दिल्यावरुन अज्ञात चोरट्यांविरुद्ध गुन्ह्याची नोंद करण्यात आली आहे. तपास सहाय्यक फौजदार आनंदसींग पाटिल, योगेश बारी करत आहेत.