TheClearNews.Com
Friday, April 10, 2026
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
No Result
View All Result
Morning News
No Result
View All Result

… पण मराठी भाषा दिनाचा कार्यक्रम नाकारता ; राज ठाकरे भडकले

The Clear News Desk by The Clear News Desk
February 27, 2021
in राज्य
0
Share on FacebookShare on Twitter

मुंबई (वृत्तसंस्था) मराठी भाषा दिनानिमित्त महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्यावतीने मराठी स्वाक्षरी कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं होतं. मात्र, कोरोनाच्या वाढत्या प्रादुर्भावाच्या पार्श्वभूमीवर राज्य सरकारनं मनसेच्या कार्यक्रमांना परवानगी नाकारली. सरकारच्या निर्णयावर मनसेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी संताप व्यक्त केला. सरकारच्या कार्यक्रमांना गर्दी होते ते चालतं पण शिवजंयती आणि मराठी भाषा दिनाच्या दिवसाला परवानगी नाकारता, अशा शब्दात राज यांनी संताप व्यक्त केला.

आज मराठी भाषा दिनाच्या निमित्ताने महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने ‘मराठीत करा स्वाक्षरी’ ही मोहिम सुरू केली होती. मात्र कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव पाहता या कार्यक्रमाला पोलिसांनी परवानगी नाकारली होती. मात्र तरीही मनसे आणि राज ठाकरेंनी हा कार्यक्रम केला. हा कार्यक्रम शिवाजी पार्क येथे पार पडला. यावेळी राज ठाकरेंनी मराठीत स्वाक्षरी केली. मराठी भाषा जपण्यासाठी हे पाऊल उचलायलाच हवे. ‘सगळ्यांनीच सगळ्या ठिकाणी मराठीत स्वाक्षरी करा’, असा सल्ला राज ठाकरेंनी दिला आहे. सरकारच्या कार्यक्रमांना गर्दी होते ते चालतं पण शिवजंयती आणि मराठी भाषा दिनाच्या दिवसाला परवानगी नाकारता, असा सवाल मनसे अध्यक्ष राज ठाकरेंनी विचारला आहे. तसेच कोरोनाची एवढी भीती वाटते तर मग निवडणुका पुढे ढकला? असा सल्ला देखील राज ठाकरेंनी यांनी दिला आहे. तसेच कोरोनाचा प्रादुर्भाव पाहता पत्रकारांनी आपण मास्क का घालत नाही? असा सवाल विचारला त्यावर राज ठाकरे म्हणाले,’मी मास्क कधीच घालत नाही. तुम्ही पण नका घालू’, असा सल्ला पत्रकारांना दिला.

READ ALSO

जळगावच्या राजकारणात मोठा भूकंप: राष्ट्रवादी पक्षाच्या बड्या नेत्याचा पुत्र भाजपच्या वाटेवर!

घरकुल अनुदानात वाढ करून प्रलंबित कामे मार्गी लावा; आमदार एकनाथराव खडसेंची विधानपरिषदेत आक्रमक मागणी

मराठी स्वाक्षरी मोहिमेबद्दल बोलताना राज ठाकरे यांनी जनतेलाही आवाहन केलं. “मला असं वाटतं की स्वाक्षरीची मोहीम पहिल्यांदाच होत नाहीये. फक्त यावेळी मोठ्या प्रमाणात करण्याचं ठरवलं. माझी मराठीजनांना विनंती आहे की, आपली स्वाक्षरी मराठीत केली तर मराठीतून काहीतरी करतो हे मनात राहतं. मी सगळीकडे मराठीत सही करतो. प्रत्येक वेळेस आसवं गाळत बसण्यापेक्षा सुरूवात करणं गरजेचं आहे. दाक्षिणात्य माणसांबद्दलच नाही. सगळ्यांबद्दल बघा. दोन गुजराती जेव्हा एकत्र येतात.. तेव्हा ते गुजरातीमध्ये बोलतात. मराठी येतात तेव्हा ते अनेकदा हिंदीमध्ये बोलतात,” असं म्हणत राज ठाकरेंनी नाराजी व्यक्त केली.

या कार्यक्रमाला मराठी कलाकार देखील उपस्थित होते. यावेळी अभिनेते संजय मोने, अभिनेत्री सायली संजीव, दिग्दर्शक -गायक अवधुत गुप्ते, अभिनेता अतुल परचुरे यासारखे कलाकार उपस्थित होेते. या कलाकारांनी देखील येथे मराठी स्वाक्षऱ्या केल्या.

 

 

Share this:

  • Facebook
  • WhatsApp
  • Telegram
  • Twitter

Related Posts

जळगाव

जळगावच्या राजकारणात मोठा भूकंप: राष्ट्रवादी पक्षाच्या बड्या नेत्याचा पुत्र भाजपच्या वाटेवर!

March 13, 2026
जळगाव

घरकुल अनुदानात वाढ करून प्रलंबित कामे मार्गी लावा; आमदार एकनाथराव खडसेंची विधानपरिषदेत आक्रमक मागणी

March 12, 2026
जळगाव

खडसेंचा विधानपरिषदेत सरकारवर प्रहार: नाशिकमधील ९ कोटींच्या अवैध गुटखा प्रकरणावरून प्रशासनाला धारेवर धरले

March 9, 2026
जळगाव

चाळीसगावच्या विकासाला अर्थसंकल्पातून मोठी चालना – २३८ कोटींची भरीव तरतूद!

March 7, 2026
जळगाव

स्मार्ट मीटर बसविण्यात महाराष्ट्राचा देशात प्रथम क्रमांक

February 19, 2026
राज्य

केंद्रीय अर्थसंकल्पात सहकारी क्षेत्राला विशेष प्राथमिकता – रोहित निकम

February 2, 2026
Next Post

संत रविदास महाराज जयंतीनिमित जिल्हाधिकारी कार्यालयात प्रतिमापूजन

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

POPULAR NEWS

…म्हणून मी सरस्वतीच्या मृतदेहाचे तुकडे केले, सानेच्या दाव्याने हत्याकांडाला नवीन कलाटणी !

June 9, 2023

भल्यापहाटे पोलीस अधिकाऱ्याने पत्नी अन् पुतण्याला गोळ्या घातल्या ; नंतर स्वतः ही उचललं टोकाचे पाऊल !

July 24, 2023

धक्कादायक ! निर्जनस्थळी प्रेमी युगलाचा रोमान्स ; शारीरिक संबंध ठेवताना अल्पवयीन तरूणीचा जागीच मृत्यू !

March 27, 2023

अपघाताचा बनाव करून पतीनेच‎ पत्नीला कारमध्ये जिवंत जाळल्याचे उघड ; कारण वाचून तुम्हाला बसेल धक्का !

June 29, 2023

किरीट सोमय्या यांचा व्हायरल व्हिडिओ खरा की खोटा? ; पोलीस तपासात समोर आली मोठी माहिती !

July 26, 2023

EDITOR'S PICK

गुगलने वसंत ऋतूचे स्वागत करण्यासाठी बनवले खास डूडल

March 20, 2021

हद्दपारीचे उल्लंघन करणाऱ्या संशयितावर एमआयडीसी पोलीसांची कारवाई !

July 22, 2024

पत्रकार सुर्यकांत कदम “पत्रकार रत्नम” राष्ट्रीय पुरस्काराने सन्मानित

October 5, 2021

Today’s Horoscope : आजचे राशीभविष्य 31 मार्च 2026 !

March 31, 2026
ADVERTISEMENT

About

The Clear News

१४ सप्टेंबर २०२० रोजी 'द क्लिअर न्यूज'ची अधिकृत सुरुवात झाली आहे. सोशल मिडियाच्या युगात अवघ्या काही क्षणात बातम्या, माहिती सर्वसामान्य माणसांपर्यंत पोहचवली जात असली तरी आपल्या मनात सर्वात मोठा प्रश्न उभा राहतो, तो म्हणजे सोशल मीडियात आलेली बातमी, माहिती ही वस्तुनिष्ठ आणि सत्यार्थी आहे का? वाचकांच्या मनातील या प्रश्नाचे उत्तर आहे ,'द क्लिअर न्यूज'...!! हो, तुमचे,आमचे ,सर्वांचे अत्यंत विश्वासार्ह असे डिजिटल न्यूज चॅनल...!!

Follow us

© . Powered by ContentOcean Infotech

No Result
View All Result
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक

© . Powered by ContentOcean Infotech

error: Content is protected !!
Join WhatsApp Group