नवी दिल्ली (वृत्तसंस्था) महानगरातील बहुतांश लोक ऑफिसला जाण्या-येण्यासाठी कारचा (Cars) वापर करीत असतात. अशातच जर तुम्हांला कमी किंमतीत जास्त कारबाबत जाणून घ्यायची असेल तर, इथे तुम्हांला ही माहिती मिळेल. चांगल्या मायलेजच्या वेगवेगळ्या सेगमेंटची यात सीएनजी कारच्या बेस्ट ऑप्शन आहेत. जाणून घ्या काही बेस्ट कम्यूट कार संबंधी.
मारुतीच्या या कारचे लाखो चाहते
तुम्ही जर डेली यूजसाठी चांगल्या मायलेजची कार खरेदी करीत असाल तर तुमच्यासाठी मारुती सुझुकीची नुकतीच लाँच करण्यात आलेली नवीन सिलेरियो एक चांगला ऑप्शन आहे. याची किंमत ४.९९ लाख रुपये ते ६.९४ लाख रुपये (एक्सशोरूम) पर्यंत आहे. यात मारुतीची सर्वात स्वस्त कार मारुती ऑल्टो ८०० सुद्धा एक चांगला ऑप्शन आहे. याची किंमत ३.१५ लाख रुपये ते ४.८२ लाख रुपयांपर्यंत आहे. ही कार सीएनजी ऑप्शन मध्ये सुद्धा आहे. यानंतर मारुती वेगनआर सुद्धा आहे. याची किंमत ४.९३ लाख रुपये ते ६.४५ लाख रुपये (एक्स शोरूम) पर्यंत आहे. मारुती स्विफ्ट हॅचबॅकची किंमत ५.८५ लाख रुपये ते ८.६७ लाख रुपये (एक्स शोरूम) पर्यंत आहे. मारुती डिझायर सिडानची किंमत ५.९९ लाख रुपये ते ९.०८ लाख रुपये (एक्स शोरूम) पर्यंत आहे. या सर्व मारुतीच्या बेस्ट मायलेज कार आहेत.
टाटाच्या या कारला लोकांची पसंती
डेली कम्यूटसाठी टाटा मोटर्सने अनेक शानदार मायलेजच्या कार आणल्या आहेत. ज्यात टाटा नेक्सॉन ईव्ही आहे. टाटा नेक्सॉन इलेक्ट्रिकची किंमत १४.२४ लाख रुपये ते १६.८५ लाख रुपये (एक्स शोरूम) पर्यंत आहे. या कारला एकदा फुल चार्ज केल्यानंतर ३०० किमी पर्यंत सहज जाता येते. यानंतर चांगला लूक आणि फीचर्सची टाटा पंच सुद्धा डेली यूज साठी खरेदी करू शकता. याची किंमत ५.४८ लाख रुपये ते ९.०८ लाख रुपये (एक्सशोरूम) पर्यंत आहे. शानदार लूकची प्रीमियम हॅचबॅक टाटा अल्ट्रोज खरेदी करू शकतात. याची किंमत ५.८९ लाख रुपये ते ९.६४ लाख रुपयांपर्यंत आहे. या कारचे मायलेज 25.11 kmpl पर्यंत आहे.