जळगाव (प्रतिनिधी) दी इन्स्टियट्यूट ऑफ चार्टर्ड अकाऊंटंट ऑफ इंडियाच्या वतीने मे २०२४ मध्ये घेण्यात आलेल्या सी. ए. इंडरमिजिएट परीक्षेचा निकाल दि.११ ला जाहिर करण्यात आला.
जळगाव शहरामधून सी. ए. इंटरमिजिएट नवीन कोर्समधून दोन्ही ग्रुपमधून राधेय दिनकर पाटील याला यश प्राप्त झाले आहे. स्वतः अभ्यास करून पहिल्याच प्रयत्नात राधेय पाटील याने यश प्राप्त केल्याने आई सौ. प्रमिला व वडिल श्री दिनकर पाटील यांच्यासह नातेवाईकांनी त्याचे कौतूक केले आहे.