जळगाव (प्रतिनिधी) शहरातील तांबपुर भागात नागरिकांना आधार कार्ड, मतदान कार्ड व इतर कागदपत्रे अपडेट करण्यात अडचणी येत होत्या. जनतेचा हा प्रश्न सोडविण्यासाठी ‘खिदमते-ए- खल्क’ चे मतीन पटेल,ईसा शेख व्यपारी यांनी शहरातील शहीद अब्दुल हमीद चौक कागदपत्रे अपडेट करण्यासाठी कॅम्प सुरू केला आहे. दोन दिवसात 450 लोकांनी शिबिराचा फायदा घेतला असून आठ दिवस चालणाऱ्या या शिबिराला जनतेचा उदंड प्रतिसाद मिळत आहे.
शिबिरांतर्गत आभा हेल्थ कार्ड,ई-श्रम कार्ड, पॅनकार्ड, कोटक बँकेचे मोफत बँक खाते उघडणे आदींसह इतर सुविधांही मोफत असल्याने शिबिराला प्रतिसाद मिळत आहे. शिबिराच्या पहिल्याच दिवशी मोठ्या संख्येने नागरिकांनी आपली कागदपत्रे अद्ययावत करून घेतली, तसेच विविध कागदपत्रांशी त्यांचे मोबाईल क्रमांकही लिंक करून घेतले.
लोकांची प्रलंबित कामे पूर्ण व्हावीत यासाठी हे शिबीर आठ दिवस चालणार असल्याचे मतीन पटेल, ईसा शेख यांनी सांगितले. हे शिबिर यशस्वी करण्यासाठी मतीन पटेल, ईसा शेख,फारुख कादरी साहेब,आबिद शेख,बासीद खान, रजाक पटेल,साहिल पठान, अमजद लाला,अरमान पटेल,आदी परिश्रम घेत आहेत. खिदमते-ए-खल्क तर्फे शाहिद अब्दुल हमीद चौक मध्ये शासकीय कागदपत्रे अद्ययावत करण्यासाठी राबविण्यात येत असलेल्या शिबिराला मोठा प्रतिसाद मिळत आहे.