TheClearNews.Com
Friday, February 6, 2026
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
No Result
View All Result
Morning News
No Result
View All Result

उद्धव ठाकरेंना बाजूला सारून शिंदे शिवसेना ताब्यात घेऊ शकता का ? ; जाणून घ्या…सेनेच्या घटनेत काय सांगितलंय?

एकनाथ शिंदेंसह बंडखोर आमदारांसमोर 'हे' तीनच पर्याय

The Clear News Desk by The Clear News Desk
June 24, 2022
in राजकीय, राज्य
0
Share on FacebookShare on Twitter

मुंबई (वृत्तसंस्था) एकनाथ शिंदे यांच्या बंडानंतर राज्यातील राजकारण ढवळून निघाले आहे. यादरम्यान एकनाथ शिंदे हे शिवसेना हा पक्ष उद्धव ठाकरेंना बाजुला सारुन ताब्यात घेऊ शकतात का? हा प्रश्न सगळ्यांना पडला आहे. दरम्यान या प्रश्नाचे उत्तर शोधण्याचा प्रयत्न प्रवीणकुमार बिरादार यांनी ट्वीटर थ्रेडच्या माध्यमातून घेतला आहे.

शिवसेनेचे नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे सध्या गुवाहाटीत आहेत मात्र त्यांच्या गटाला मान्यता विधीमंडळाच्या सभागृहातच मिळू शकते. त्यासाठी त्यांना मुंबईत यावे लागेल त्यातही अनेक तांत्रीक अडचणी आहेत. एकंदरीत शिंदे यांच्या राजकीय विजयाचा मार्ग खडतर आसल्याचे दिसत आहे. शिवसेनेच्या प्रतोदांच्या सहीचे बंडखोर १२ आमदारांचे सदस्यत्व रद्द करण्याचे पत्र विधानसभा उपाध्यक्षांना दिले आहे. महाविकास आघाडी सरकार बहुमतात आहे की नाही? याचा निर्णय विधिमंडळातच होईल.

READ ALSO

स्थायी समिती सभापती, स्वीकृत नगरसेवकांसाठी रस्सीखेच

केंद्रीय अर्थसंकल्पात सहकारी क्षेत्राला विशेष प्राथमिकता – रोहित निकम

शिंदे यांनी शिवसेना ताब्यात घेणे कितपत शक्य आहे?

एकनाथ शिंदे यांनी शिवसेना ताब्यात घेणे कितपत शक्य आहे? याची कायदेशिर बाजू काय आहे, तर एकनाथ शिंदे यांनी उद्धव ठाकरेंना डावलून शिवसेना ताब्यात घेणं सध्यातरी कठीण आहे, त्यामागील कारणांचा विचार केला तर, यामध्ये प्रत्येक पक्षाला एक घटना असते आणि त्यात काही नियम, अधिकार हे निश्चित केलेले असतात. त्यामुळे पक्षाने निवडणूक आयोगाला दिलेली घटना/संविधान हे अधिकृत असते. त्यात घालून दिलेल्या नियमानुसार पक्षाचा कारभार चालवला जातो.

सध्याच्या राजकीय परिस्थितीचा विचार करता, शिवसेनेच्या घटनेत ‘शिवसेना प्रमुख’ हे पद सर्वोच्च आहे आणि फक्त शिवसेना प्रमुख यांनाच कुणालाही पक्षातून काढण्याचा अधिकार आहे ते देखील राष्ट्रीय कार्यकारिणीच्या संगनमताने, त्यामुळे उद्धव ठाकरे यांचा निर्णय सर्वोच्च असणार आहे.

मग शिंदे शिवसेना प्रमुख पदी बसू शकतात का?

तर या प्रश्नाचे उत्तर हे नाही असे आहे. शिवसेना प्रमुख हे प्रतिनिधी सभेचे सदस्य निवडून देतात. ज्यात फक्त आमदार, खासदार नसतात, तर जिल्हा प्रमुख, जिल्हा संपर्क प्रमुख ते मुंबईतील विभाग प्रमुख इत्यादी नेते असतात. यामध्ये २०१८ मध्ये एकूण २८२ जण होते, ज्यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना शिवसेना प्रमुख पदी निवडून दिले होते.

म्हणजे ज्या राष्ट्रीय कार्यकारिणीच्या संगनमताने शिवसेना प्रमुख काम करतात, त्या राष्ट्रीय कार्यकारिणीतील १४ सदस्य हे पण प्रतिनिधी सभा निवडून देतात आणि जास्तीत जास्त ५ जणांची नियुक्ती ही शिवसेना प्रमुख करतात. तर आता ह्या राष्ट्रीय कार्यकारिणीचे सदस्य कोण आहेत? ह्या राष्ट्रीय कार्यकारिणीच्या सदस्यांना शिवसेनेत ‘पक्ष नेते’ या नावाने ओळखलं जातं. २०१८ मध्ये प्रतिनिधी सभेने खालील यादीतील ९ जणांना पक्ष नेते म्हणून निवडून दिले, आदित्य ठाकरे, मनोहर जोशी, सुधीर जोशी, लीलाधर डाके, सुभाष देसाई, दिवाकर रावते, रामदास कदम, संजय राऊत आणि गजानन कीर्तिकर यांचा समावेश आहे आणि विशेष बाब म्हणजे यात एकनाथ शिंदे निवडून आले नाहीत, पण आदित्य ठाकरे आले आहेत. ही निवड ५ वर्षांसाठी असते.

नियुक्ती रद्द करण्याचा अधिकार शिवसेना प्रमुखाकडे असतात

शिवसेना प्रमुख यांच्या अधिकारानुसार ज्या ४ जणांना ते पक्ष नेते (राष्ट्रीय कार्यकारिणी सदस्य) म्हणून नियुक्त करु शकतात, त्यानुसार त्यांनी एकनाथ शिंदे यांच्यासह ईतर ३ जणांची नियुक्ती केली. जी नियुक्ती रद्द करण्याचा अधिकार हे शिवसेना प्रमुखाकडे असतात. आता जर मुख्य शिवसेना पक्ष जर शिंदेंना ताब्यात घ्यायचा असेल तर त्यांना प्रतिनिधी सभेतून निवडून यावं लागेल, त्यात २५० पेक्षा जास्त सदस्य आहेत त्यांना सोबत घ्यावं लागेल, तरच निवडणूक आयोग त्यांना मान्यता देऊन त्यांना शिवसेना पक्ष गृहीत धरू शकतो आणि शिंदेंनी पक्षाची घटना बदलविण्याचा प्रयत्न केला तर अपयशी ठरतील, कारण शिवसेनेच्या घटनेत हे अधिकार राष्ट्रीय कार्यकारिणीला देण्यात आले आहेत, जिथे शिंदे गटाचे संख्या बळ कमी आहे. त्यातही वाद झाला तर शिवसेना प्रमुखांचा निर्णय अंतिम असेल. यामुळे एकनाथ शिंदे यांनी शिवसेना ताब्यात घेणं कठीण आहे. त्यामुळे राज्यातील राजकीय परिस्थिती येत्या काही दिवसात कोणते वळण घेईल याकडे सामान्य शिव सैनिकांचे तसेच महाराष्ट्रातील जनतेचे लक्ष लागले आहे.

Share this:

  • Facebook
  • WhatsApp
  • Telegram
  • Twitter

Related Posts

जळगाव

स्थायी समिती सभापती, स्वीकृत नगरसेवकांसाठी रस्सीखेच

February 5, 2026
राज्य

केंद्रीय अर्थसंकल्पात सहकारी क्षेत्राला विशेष प्राथमिकता – रोहित निकम

February 2, 2026
राज्य

विकसनशील भारताचा विकसित दिशेने नेणारा दूरदृष्टीपूर्ण अर्थसंकल्प – गुलाबराव पाटील

February 1, 2026
जळगाव

एआय ते हाय व्हॅल्यू क्रॉप्स, सरकारच्या मोठ्या घोषणा, आता अंमलबजावणीकडे लक्ष- अशोक जैन

February 1, 2026
जळगाव

जळगाव महापालिकेच्या महापौर पदासाठी ओबीसी महिला आरक्षण; भाजपामध्ये तीन प्रमुख नावांचे चर्चा !

January 22, 2026
जळगाव

मनपात प्रथमच होणार सात स्वीकृत नगरसेवक

January 21, 2026
Next Post

शिवसेनेला पुन्हा धक्का ; शिवसेना नेते खोतकरांची ७८ कोटींची संपत्ती ईडीकडून जप्त

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

POPULAR NEWS

…म्हणून मी सरस्वतीच्या मृतदेहाचे तुकडे केले, सानेच्या दाव्याने हत्याकांडाला नवीन कलाटणी !

June 9, 2023

भल्यापहाटे पोलीस अधिकाऱ्याने पत्नी अन् पुतण्याला गोळ्या घातल्या ; नंतर स्वतः ही उचललं टोकाचे पाऊल !

July 24, 2023

धक्कादायक ! निर्जनस्थळी प्रेमी युगलाचा रोमान्स ; शारीरिक संबंध ठेवताना अल्पवयीन तरूणीचा जागीच मृत्यू !

March 27, 2023

अपघाताचा बनाव करून पतीनेच‎ पत्नीला कारमध्ये जिवंत जाळल्याचे उघड ; कारण वाचून तुम्हाला बसेल धक्का !

June 29, 2023

किरीट सोमय्या यांचा व्हायरल व्हिडिओ खरा की खोटा? ; पोलीस तपासात समोर आली मोठी माहिती !

July 26, 2023

EDITOR'S PICK

एमआयडीसी पोलिसांची अवैध दारू विक्रेत्यावर कारवाई ; दोघांविरुद्ध गुन्हा

September 29, 2020

नामर्दासारखे कार्टून दाखवू नका म्हणणाऱ्या पूनम महाजनांना संजय राऊतांनी दिलं उत्तर ; म्हणाले…

January 25, 2022

अती पावसामुळे नुकसान झालेल्या भागातील पंचनामे करुन, अहवाल सादर करा !

August 5, 2024

अंतुर्लीत भरदिवसा धाडसी घरफोडी ; पावणेदोन लाखांचा ऐवज लंपास !

January 12, 2024
ADVERTISEMENT

About

The Clear News

१४ सप्टेंबर २०२० रोजी 'द क्लिअर न्यूज'ची अधिकृत सुरुवात झाली आहे. सोशल मिडियाच्या युगात अवघ्या काही क्षणात बातम्या, माहिती सर्वसामान्य माणसांपर्यंत पोहचवली जात असली तरी आपल्या मनात सर्वात मोठा प्रश्न उभा राहतो, तो म्हणजे सोशल मीडियात आलेली बातमी, माहिती ही वस्तुनिष्ठ आणि सत्यार्थी आहे का? वाचकांच्या मनातील या प्रश्नाचे उत्तर आहे ,'द क्लिअर न्यूज'...!! हो, तुमचे,आमचे ,सर्वांचे अत्यंत विश्वासार्ह असे डिजिटल न्यूज चॅनल...!!

Follow us

© . Powered by ContentOcean Infotech

No Result
View All Result
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक

© . Powered by ContentOcean Infotech

error: Content is protected !!
Join WhatsApp Group