जळगाव (प्रतिनिधी) जिल्हा एनएसयुआयचे जिल्हाध्यक्ष देवेंद्र मराठे यांच्या नेतृत्वात आज वैद्यकीय शिक्षण अभ्यासक्रमाच्या प्रवेशासाठी NEET परीक्षा रद्द करण्यात यावी, अशी मागणी महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री यांच्याकडे जिल्हाधिकारी अभिजित राऊत यांच्या मार्फत निवेदन देऊन करण्यात आली.
वैद्यकीय शिक्षण अभ्यासक्रमाच्या प्रवेशासाठी NEET परीक्षा आयोजित केले जाते. परंतु देशभरात दिवसेंदिवस परीक्षेसंदर्भात गैरप्रकार होत असल्याचे आढळून येत आहे. राज्य परीक्षा मंडळ व इतर शैक्षणिक अभ्यासक्रम यांच्यात तफावत आहे. NCERT च्या धर्तीवर असल्याने राज्य शिक्षण मंडळाचे विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान होत आहे. तसेच ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना शहरात येऊन मागणी कोचिंग क्लास लावणे आर्थिक दृष्ट्या परवडत नाही. त्यामुळे सर्वसामान्य कुटुंबातील विद्यार्थ्यांचे डॉक्टर बनून सेवा देण्याचे स्वप्न धुळीस मिळत आहे. जसे तामिळनाडू राज्य सरकारने ज्या पद्धतीने निर्णय घेऊन NEET परीक्षा रद्द केल्यामुळे सर्वसामान्य आर्थिक दृष्ट्या कमकुवत असलेल्या विद्यार्थ्यांना शिक्षण घेणे सुलभ होईल. त्या धर्तीवर महाराष्ट्र राज्य सरकारने सुद्धा या सर्व बाबींचा विचार करून १२ वीच्या गुणांधारित वैद्यकीय शिक्षण अभ्यासक्रमास प्रवेश देऊन नीट प्रवेश परीक्षा रद्द करुन विद्यार्थ्यांना न्याय मिळवून द्यावा, अशी मागणी महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री यांच्याकडे जिल्हाधिकारी अभिजित राऊत यांच्या मार्फत निवेदन देऊन करण्यात आली. याप्रसंगी जिल्हाध्यक्ष देवेंद्र मराठे, अल्पसंख्यांक विभागाचे शहराध्यक्ष अमजद पठाण, अल्पसंख्याक विभाग जिल्हाउपाध्यक्ष जाकिर बागवान, आदी पदाधिकारी कार्यकर्ते उपस्थित होते.