पारोळा (प्रतिनिधी) कॅप्सूल टँकर व कार यांच्यात झालेल्या अपघातात पालिका अभियंता आणि डॉक्टर ठार झाल्याची दुर्दैवी घटना घडली आहे.
कॅप्सूल टँकर व कारचा अपघाताची घटना पारोळ्यानजीक विचखेडा गावाजवळ सोमवारी सकाळी ७ वाजता घडली. मृतांमध्ये पारोळा नगरपालिकेचे अभियंता कुणाल सौपुरे (३५, रा. गोंधळ वाडा, पारोळा ) आणि डॉ. निलेश मंगळे (३५ रा. डी. डी. नगर, पारोळा) यांचा समावेश आहे. या अपघातात संदीप पवार ३७, रा.आर. एल. नगर, पारोळा) हे जखमी झाले आहेत. शनिवार, रविवार सुट्टी असल्याने तिघे मित्र मुंबई येथे गेले होते. परतीचा प्रवास करत असताना पारोळ्यापासून काही अंतरावर असतानाच काळाने घाला घातला. या अपघातामुळे गावावर शोककळा पसरली आहे.