धरणगाव (प्रतिनिधी) शहरातील वैभव नगर परिसरातून घरासमोर लावलेली मालवाहू पिकअप व्हॅन चोरीला गेल्याची घटना उघडकीस आली आहे. या प्रकरणी धरणगाव पोलिसात अज्ञात चोरट्यांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
या संदर्भात अधिक असे की, सचिन मधुकर पाटील (रा. गुजराथी गल्ली) यांचा शेती तसेच फिल्टर पाण्याचा व्यवसाय आहे. दि. ८ फेब्रुवारी रोजी त्यांची महेंद्रा मालवाहू पिकअप व्हॅन (क्र. एम.एच १९, एस. ७३९९) ही आपली वैभव नगर परिसरात राहणाऱ्या आपल्या बहिणीच्या घराबाहेर लावलेली होती. अज्ञात चोरट्याने मध्यरात्री साधारण दीड वाजेच्या सुमारास चोरुन नेली. या प्रकरणी धरणगाव पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास पो.ना. उमेश पाटील हे करीत आहेत.