जामनेर (प्रतिनिधी) माजी नगराध्यक्ष पारस ललवाणी यांच्या विरोधात अल्पवयीन मुलीचा बळजबरीने विवाह लाऊन देण्यासह विनयभंग केल्याप्रकरणी ‘पोक्सो’ कायद्यांतर्गत गुन्हा दाखल झाला आहे. दरम्यान, लालवाणी यांनी माजी जलसंपदा मंत्री आ. गिरीश महाजन यांच्याविरुद्ध मागील काही दिवसांपूर्वी गंभीर आरोप करून खळबळ उडवून दिली होती.
ललवाणी यांच्याविरुद्ध श्रीरामपूर (जि. अहमदनगर) येथे गुन्हा दाखल झाला असून शून्य क्रमांकाने जामनेर पोलीस स्थानकात वर्ग झाला आहे. एका अल्पवयीन मुलीने फिर्याद दिली आहे. त्यानुसार दिवाळी नंतर अंदाजे ८ दिवसांनी मी, वडील व आई असे तिथे आम इंडिगो सीएस या गाडीने सुनिल कोचर यांचे परी सिल्लोड येथे गेलो व तेथून मानलेले मामा सुनिल कोचर यांच्या सोबत आम्ही सर्वजण जामनेर येथे विकास ललवाणी यांचे घरी गेली. त्यानंतर पारस ललवाणी यांनी त्यांचे पर वगैरे दाखविले व मुलाला पण पाहून प्या असे म्हणून मुलगा नामे वृषभ विकास समवाणी यास आम्हाला दाखविले. त्यावेळेस तो काहीही न बोलल्याने तो तोतरा आहे हे माझ्या लक्षात आले नाही. त्यानंतर आम्ही सुनिल कोचर यांना त्यांचे घरी सिल्लोड येथे सोडून आमचे श्रीरामपूर येथे घरी निघून आलो. त्यानंतर माझी आई ज्योती हिने माझे लग्न करू नये म्हणून वडील चंदुलाल कोठारी यांना विनंती केली असता वडीलांनी परत माझ्या आईला मारहाण केली. यानंतर माझे वृषभ ललवाणी यांच्यासोबत ९ डिसेंबर २०२० रोजी लग्न लाऊन दिले. यानंतर एके दिवशी पारसमल झुंबरलाल ललवाणी हे माझ्या घरी आल्यानंतर त्यांनी विनयभंग केला. याबाबत कुटुंबियांना माहिती दिल्यानंतर त्यांनी तुला त्यांच्यासोबत संबंध ठेवावे लागतील असे सांगत दबाव टाकला. यानंतर तिचा सासरी छळ सुरू झाला.
यामुळे पिडीत मुलीने श्रीरामपूर जिल्हा अहमदनगर येथे फिर्याद दाखल केली. यात सावत्र वडील चंदूलाल सुहालाल कोठारी, मानलेले मामा सुनील कोचर (रा. सिल्लोड, जिल्हा औरंगाबाद); चुलत सासरे पारस झुंबरलाल ललवाणी; पती वृषभ विकास ललवाणी, सासरे विकास ललवाणी, दीर भावेश ललवाणी व सासू यांच्या विरोधात गुन्हा दाखल केला आहे. यात पारस झुंबरलाल ललवाणी यांच्यासह इतरांच्या विरोधात भादंवि कलम ३५४-अ; पोक्सो कलम-१२; बालविवाह प्रतिबंधक कायदा ११ प्रमाणे गुरनं १२२/२०२१ नुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे. हा गुन्हा आता शून्य क्रमांकाने जामनेर पोलीस स्थानकात वर्ग करण्यात आला आहे.