पाचोरा (प्रतिनिधी) शहरात स्वीट मार्टच्या दुकानातून 20 हजारांची रोकड लांबवली ! शहरातील एका स्वीट मार्टच्या दुकानातून अज्ञात चोरट्यांनी 20 हजारांची रोकड लांबवल्याचा प्रकार उघडकीस आल्याने खळबळ उडाली आहे. याप्रकरणी अज्ञाताविरोधात पाचोरा पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला.
पाचोरा शहरातील सिंधी कॉलनीतील शिव मंदिराजवळ भवानी स्वीट मार्ट हे जितेंद्र टेकचंद पंजाबी (सिंधी कॉलनी, पाचोरा) यांचे दुकान आहे. अज्ञातांनी दुकानाच्या गल्ल्यातून 20 हजारांची रोकड लांबवली. 22 ते 23 जुलैदरम्यान घडला. याप्रकरणी पाचोरा पोलिसात अज्ञात चोरट्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला. तपास हवालदार भगवान बडगुजर करीत आहेत.